विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती जोपासावी – डॉ.पी.आर.चौधरी : नूतन मराठा महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन

0
जळगाव |  प्रतिनिधी  :  सर्वांगिण व्यक्तिमत्व विकासासाठी वाणिज्य मंडळासारखे उपक्रम उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांनी संशोधनाशी वृत्ती जोपासून शिखर गाठावे, असे प्रतिपादन धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी केले.

नुतन मराठा महाविद्यालयामध्ये वाणिज्य व अर्थशास्त्र मंडळाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.एस.डी.पाटील हे तर उपप्राचार्य प्रा.डी.पी.पवार, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.विजय पवार, वाणिज्य मंडळ अध्यक्ष प्रा.राजेंद्र देशमुख उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन वाणिज्य व अर्थशास्त्र मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. वाणिज्य व अर्थशास्त्र मंडळ हे विद्यार्थ्यांसाठी निश्‍चितपणे उपयुक्त ठरेला असा विश्‍वासही प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डी.पी.पवार यांनी केले.

सुत्रसंचलन प्रा.राजेंद्र देशमुख तर आभार प्रा.विजय पवार यांनी मानले. कार्यक्रमास प्रा.डॉ.गोपाळ कोल्हे, प्रा.बी.बी.पाटील, प्रा.पी.आर.बागुल, प्रा.विजय पालवे, प्रा.योगेश पाटील, प्रा.सविता माळी, प्रा.निता पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*