25 कोटींच्या कामासाठी ना-हरकत दाखला द्या !

0
जळगाव । दि.10 । प्रतिनिधी – मुख्यमंत्र्यांनी जळगाव शहरातील विकासकामांसाठी मंजुर केलेल्या 25 कोटींच्या कामांसाठी ना-हरकत दाखला द्यावा अशी मागणी भाजपातर्फे जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान महासभेत खाविआचे सभागृह नेते रमेशदादा जैन यांनी दिलेल्या धमकीचाही यावेळी भाजपातर्फे निषेध करण्यात आला.
जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात भाजपाने म्हटले आहे की, शहरातील मुलभूत गरजा पुर्ण होण्यासाठी 25 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

संयुक्त समितीच्या निर्णयानुसार हा 25 कोटीचा निधी बांधकाम विभागाकडे वळता करण्यात आला आहे. ही कामे मनपाच्या माध्यमातून न झाल्यास खासदार व आमदार निधीतील कामांना मनपातर्फे ना-हरकत दाखला देण्यात येणार नाही अशी धमकी खाविआचे सभागृह नेते रमेशदादा जैन यांनी काल मनपाच्या विशेष महासभेत दिली होती.

या धमकीचा निषेध व्यक्त करीत असल्याचे भाजपाने निवेदनात नमूद केले आहे. तसेच विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागास ना-हरकत दाखला मिळवून द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी नगरसेवक सुनिल माळी, वामन खडके, दिपक सुर्यवंशी, राजेंद्र पाटील, उज्ज्वला बेंडाळे, सरीता नेरकर, वंदना पाटील, स्नेहा निंभोरे, राजेंद्र मराठे, राहुल वाघ, मनोज काळे, प्रकाश बलाणी, किशोर बाविस्कर, आनंद गोयर, भरत वाघ, प्रविण गुरव, दत्तात्रय जाधव, विनोद मराठे, किशोर चौधरी, आनंद सपकाळे, बापु कुमावत, धनंजय पाटील, निलेश तायडे, रियाज शेख, गणेश पाटील, नितीन पाटील, ज्योती चव्हाण आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*