..तर मनसे करणार लांडोरखोरी उद्यानाचे उद्घाटन

0
जळगाव । दि.10 । प्रतिनिधी – मोहाडी परीसरातील लांडोरखोरी वनउद्यानाचे दि. 15 ऑगस्टपर्यंत उद् घाटन न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेला सोबत घेऊन उद्घाटन करणार असल्याचा इशारा जिल्हा सचिव अ‍ॅड. जमील देशपांडे यांनी जळगाव उपवनसंरक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मोहाडी परीसरात लांडोरखोरी वन उद्यान विकसीत करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासुन या वन उद्यानाचे उद्घाटन रखडले आहे.

त्यामुळे हे उद्यान अद्यापपर्यंत जनतेसाठी खुले करण्यात आले नाही. येत्या 15 ऑगस्टपर्यंत लांडोरखोरी वनउद्यानाचे उद्घाटन न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेला सोबत घेऊन उद्घाटन करणार असल्याचा इशारा जिल्हा सचिव अ‍ॅड. जमील देशपांडे यांनी जळगाव उपवनसंरक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 

LEAVE A REPLY

*