Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या राजकीय

ही मोदींची त्सुनामीच : देवेंद्र फडणवीस

Share
मुंबई :  भाजपच्या या विजयामुळे या देशात मोदींची त्सुनामीच असल्याचं स्पष्ट झालं आहे अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. तसंच जनतेने दिलेल्या कौलाचा आदर करत त्यांनी मतदारांचे आभारही मानले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जनतेचे आभार मानले आहेत. ‘निवडणुकीआधी देशात मोदींची ‘मुक लाट’ असून ती त्सूनामीत परिवर्तीत होईल असं मी सांगितलं होतं. आजच्या निकालातून हेच चित्र स्पष्ट झालं आहे. देशात मोदींची त्सुनामीच आहे’. अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केलं.

दरवेळी सत्ताधारी पक्षाबद्दल जनतेच्या मनात रोष असतो ज्याला अॅण्टी-इन्कंबन्सी म्हटलं जातं. पण यावेळी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारबद्दल जनतेच्या मनात पोषक वातावरण अर्थात प्रो-इन्कंबन्सी आहे असा दावा फडणवीस यांनी केला आहे. मोदींच्या आणि राज्यातील भाजप सरकारच्या विकास कामांच कौतुक करत मोदींवर लोकांना प्रचंड विश्वास आहे हे देशात फिरताना अनेकदा जाणवत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

विरोधकांच्या टीकेचा काही परिणाम मतदारांवर झाला नसून आधीपेक्षा जास्त मतांनी यावेळी मोदींना निवडून दिलं आहे , आधीपेक्षा जास्त प्रेम मोदींना लोकांनी दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी जनतेचे आभार मानले. तसंच गेली पाच वर्ष ज्या शिवसेनेवर टीका केली त्याच शिवसेनेने सहकार्य केल्याबद्दल त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले आहे. एनडीएतील इतर घटक पक्षांचेही यावेळी त्यांनी आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!