Type to search

# निवडणूक विशेष # दीड लाखाच्या मताधिक्याचे आ. उन्मेष पाटील यांनी दिले श्रेय कार्यकर्त्यांना व नेत्यांना

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या राजकीय

# निवडणूक विशेष # दीड लाखाच्या मताधिक्याचे आ. उन्मेष पाटील यांनी दिले श्रेय कार्यकर्त्यांना व नेत्यांना

Share

जळगाव | देशदूत डिजीटल : जळगाव लोकसभा निवडणूकीत दीड लाखाचे मताधिक्य मिळविल असा ठाम विश्वास होता. तो भाजपा, शिवसेना व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर. त्यांच्यामुळेच हे मताधिक्य मिळवू शकलो असल्याची प्रतिक्रिया जळगाव लोकसभेचे भाजपाचे उमेदवार आ. उन्मेष पाटील यांनी दिली आहे.

आ. पाटील हे जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांच्या विश्वासातील. त्यामुळेच त्यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचाराची सारी धुरा ना. गिरीष महाजन यांनी सांभाळली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री ना. गुलाबराव पाटील, शहराचे आमदार राजु मामा भोळे, विधान परिषदेचे आ. श्री. पटेेल, माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासारख्या धुरींधर नेत्यांसोबत सर्व कार्यकर्त्यांनी प्रचार केला. यासोबतच मतदानाचा टक्काही वाढविला. या सर्वांच्या परिश्रमाचा परिपाक म्हणजे आ. पाटील यांची दीड लाखाचे मताधिक्य मिळवित विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे.

हरात आनदोंत्सव

दरम्यान शहरात ना. गिरीष महाजन यांच्या संपर्क कार्यालयातच आ. पाटील यांचे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले होते. या प्रचार कार्यालयात सकाळी दहा वाजल्यापासूनच जल्लोषास सुरवात झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!