Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव धुळे नंदुरबार मुख्य बातम्या राजकीय

# निवडणूक विशेष # खान्देशात भाजपा निर्णायक विजयाकडे

Share

पंकज पाटील । रविंद्र पाटील । देशदूत डिजीटल : खान्देशातील चारही जागांवर भाजपाने निर्णायक आगाडी घेतली असून प्रारंभी नंदुरबारमधून आघाडीवर असलेल्या काँग्रेसला धक्का देत भाजापाच्या हिना गावित यांनी आघाडी घेतली असून धुळ्यात आधीपासूनच आघाडीवर असलेल्या डॉ.सुभाष भामरे,जळगाव मधून आ.उन्मेश पाटील तर रावेरमधून रक्षा खडसे यांनी दहाव्या फेरीअखेर लाखाच्यावर मताधिक्य मिळविल्याने शेवटच्याफेरीपर्यंत हे माताधिक्य कितीने वाढते याचीच उत्सुकता आता बाकी आहे.

लोकसभा निवडणूकीचा बिगुल वाजल्यानंतर रावेर, जळगाव, धुळे, नंदुरबार लोकसभा मतदार संघात भाजपा शिवसेना युती व राष्ट्रवादी- काँग्रेस व इतर यांच्या युतीचे उमेदवार जाहीर झालेत. सर्वच उमेदवार तुल्यबळ असले तरी या चारही मतदार संघात भाजपाला यश मिळेल असे दावे केले जात होते. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार या चारही मतदार संघात भाजपाच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतदानाच्या आघाडीवरून त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. परंतू ही मतांची आघाडी आहे. अजून मतमोजणीच्या काही फेर्‍या बाकी आहेत.

रावेर लोकसभा

रावेर लोकसभा मतदार संघात विद्यमान भाजापाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनाच तिकिट मिळणार असल्याचे निश्चित होते. त्यामुळे येथे तिकिटासाठी रक्षाताई या एकमेव उमेदवार होत्या आणि त्या हमखास निवडूण येणार हे त्याचवेळी चर्चेत होते. रावेर साठी राष्ट्रवादीतर्फे उमेदवर असले तरी तुल्यबळ असा उमेदवार नसल्याने म्हणा किंवा इच्छा नसल्याने अखेरच्या क्षणापर्यत राश्ट्रवादीने उमेदवारीसाठी घोळ घातला. आणि अखेरच्या काही दिवसात ही जागा काँग्रेससाठी सोडली. ऐनवेळी जागा मिळाल्याने काँग्रेसलाही तृल्यबळ उमेदवार शोधणे जरा कठिणच होेते.

त्यामुळे अखेरीस माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना तिकिट जाहीर केले. डॉ. पटील यांना तिकिट जाहिर होऊन त्यांनी प्रचार सुरू करेपर्यत रक्षाताई यांनी प्रचाराची एक ते दोन फेर्‍या पूर्ण केल्या होत्या. माजी महसुल मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे उपचारासाठी मुंबई येथे दवाखान्यात दाखल असल्याने त्यांचा सुनेच्या प्रचारात सहभाग तसा कमी होता. प्रत्यक्ष प्रचारात नसले तरी आ. खडसे यांनी मुंबईतून प्रचाराची सुत्रे सांभाळली.

तर प्रत्यक्ष मैदानात स्वत : रक्षाताई, ना. गिरीष भाऊ महाजन, आ. संचेती, चोपड्याचे शिवसेनेचे माजी आ. कैलास पाटील याच्यासह भाजप शिवसेनेच्या आमदार, लोकप्रतिनिधींनी रक्षाताईच्या प्रचाराची धुरा समर्थपणे पेलली. तर कॉग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांना प्रचारासाठी अत्यल्प वेळ मिळाला. त्यातही त्यांनी आपल प्रचार पूर्ण ताकदिनिशी केला.

जळगाव

जळगाव लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना तिकिट जाहिर केले. श्री. देवकर लोकसभा लढवण्यास मूळातच उत्सुक नव्हते. परंतू पक्षाचे अध्यक्ष ना. शरदराव पवार यांनी आदेश दिल्याने श्री. देवकर यांनी उमेदवारी स्विकारत प्रचारही सुरू केला. मात्र भाजपाने यात उमेदवार देण्यावरून बराच खल चालवला.

अखेरीस विद्ममान खासदार ए.टी. पाटील यांना तिकिट नाकारत विधान परिषदेच्या आ. स्मिताताई वाघ यांना तिकिट जाहिर केले. यामुळे खा. पाटील नाराज झालेत. तर आ. स्मिता ताईंना तिकिट मिळाल्याने भाजपातून नाराजी व्यक्त केली गेली. हे नाराजीनाट्य चालु असतांनाही आ. स्मिता ताई वाघ यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण करत असतांनाच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवस आधी भाजपाने स्मिताताईंची उमेदवारी रद्द करून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे आ. स्मिताताईंसह त्यांचे पती व भाजपाचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे नाराज झालेत.

दरम्यान अमळनेर येथे प्रचार सभेत भाजपाचे माजी आमदार बी.एस. पाटील यांना भाजपाच्याच व्यासपीठावर दोन मंत्र्यांसमोर मारहाण करण्यात आली. एकूण जळगाव लोकसभेत भाजपाअंतर्गत संदोपोसुदीमुळे ही जागा जाणार असल्याचे चित्र दिसत होते. परंतू भाजपाच्या श्रेष्ठीनी एकातांत नाराजांना कानपिचक्या दिल्याने अमळनेर नंतर कोठेही नाराजी उघडपणे दिसून आली नाही. यात उमेदवार उन्मेष पाटील यांनी आपला प्रचार ताकदीनिशी सुरू ठेवला.

धुळे व नंदुरबार

धुळ्यात आ. अनिल गोटे यांचा विरोध वगळता विद्यमान मंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांनी व नंदुरबारला खा. डॉ. हिना गावीत यांनी प्रचारात आघाडी घेतली. नंदुरबारलाही उमेदवारी देण्यावरून नाराजी ओढवली. नाराजांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. पंरतू नंदूरबारला डॉ. हिना गावीत व धुळ्यात डॉ. भामरे यांनी मताधिक्य घेत विजयाकडे आगेकुच केल्याचे दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!