आदिवासींच्या विकासासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालय कटीबद्ध – आर.बी.हिवाळे

0

यावल, |  प्रतिनिधी :  आदिवासींच्या विकासा करीता शासना कडून एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय बांधील आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना यापुर्वी विविध योजनेतुन साहित्य दिलेे जात होते व ते साहित्य दर्जेदार नसायचे अशी ओरड होत होती.

मात्र, आता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यावर शैक्षणीक वर्षात लागणार्‍या संपुर्ण साहित्याची रक्कम शासन देत असुन या पुढे विद्यार्थ्यी आपल्या मना प्रमाण व चांगले साहित्य घेवु शकतो असेे प्रतिपादन प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी केले. बुधवारी जागतिक आदिवासी अस्मिता दिना निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते

येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने जागतिक आदिवासी अस्मिता दिन  साजरा करण्यात आला.

या निमित्ताने आदिवासी प्रकल्प कार्यालया पासुन पारंपारीक वेशभुषेत आदिवासी बांधव रॅली काढण्यात आली व फैजपूर रस्त्यावरील नेवे मंगल कार्यालयात या रॅलीचा समारोप होवुन येथे मान्यवरांनी  मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुरेखा कोळी तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद कॉग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे, पंचायत समिती सभापती संध्या किशोर महाजन, प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे, पंचायत समितीच्या माजी सदस्या मिना तडवी, नगरसेविका नौशाद तडवी, चोपडा पंचायत समितीचे सदस्य भरत कोळी, कृषी अधिकारी सी. जे. पाडवी, जया सोनवणे, एम. बी. तडवी, राजु बारेला, मुनाफ तडवी, जहॉगीर तडवी, सुनिल गायकवाड, अलीशान तडवी, अजय चव्हाण, रामचंंद्र पाटील, गटविकास अधिकारी वाय. पी. सपकाळे सह मोठ्या प्रमाणावर आदिवासी संघटना, संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होत्याकार्यक्रमाचे सुत्रसंचालन अविनाश शिवरामे यांनी केले.

विद्यार्थ्यांचा गौरव

प्रसंगी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या शासकिय आदिवासी आश्रम शाळेतील इयत्ता १० वी गुणवत्ता यादी आलेले विद्यार्थीनींचा गुण गौरव करण्यात आला होता.

मान्यवरांचा रोप देवून सत्कार.

या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांना प्रकल्प कार्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करतांना प्रत्येक एक रोपटे देवुन स्वागत करण्यात आले व सदरील रोपं मान्यवरांनी रोपन करून संगोपन करावे अशी अपेेक्षा व्यक्क्त करण्यात आली.

रक्तदान शिबीराला प्रतिसाद

जागतिक आदिवासी अस्मिता दिन साजरा करतांना वेगळा उपक्रम म्हणजे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबीरात प्रकल्प कार्यालयातील कर्मचारींसह उपस्थितांनी रक्तदान केले.

LEAVE A REPLY

*