भुसावळ । दि.9 । प्रतिनिधी-‘देशदूत’च्या भुसावळ विभागीय कार्यालयाचा 17वा वर्धापनदिन दि.9 ऑगस्ट रोजी ब्राह्मण संघात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संपादक हेमंत आलोने, महाव्यवस्थापक विलास जैन, जाहिरात व्यवस्थापक प्रदीप जाधव, वितरण व्यवस्थापक विजय महाजन यांनी शुभेच्छांचा स्विकार केला.

नगराध्यक्ष रमण भोळे, माजी आ.दिलीप भोळे, माजी आ.शिरीष चौधरी, नगरसेवक उल्हास पगारे, रवि सपकाळे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, राजू सूर्यवंशी, प्रदीप देशमुख, देवेंद्र वाणी, प्रा.डॉ.सुनील नेवे, गिरीश महाजन, माजी नगराध्यक्ष विजय चौधरी, शिशिर जावळे यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकर्‍यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. ‘देशदूत’च्या सामाजिक योगदानाबद्दल अनेकांनी यावेळी कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ उपसंपादक नीरज वाघमारे, शंतनू गचके, संजय ठाकूर, वितरक श्रीकांत कुलकर्णी, सुनील सूर्यवंशी, विराज वाघमारे यानी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

*