मोहन पहेलवान हत्त्याकांडातील तिसरा संशयीत जॅकी पथरोडचा भोपाळ येथे खून

0
भुसावळ । दि.9। प्रतिनिधी-येथील वाल्मिक नगरमधील मेहतर समाजाचे प्रमुख मोहन बारसे पहेलवान यांच्या खून प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी जॅकी पथरोड याचा मध्यप्रदेशातील भोपाळ येथे रस्त्यावर धारदार चाकुने निघृर्ण खून झाल्याची घटना दि. 9 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे भुसावळमध्ये खळबळ उडाली आहे.
जॅकी पथरोड हा त्याची पत्नी जया पथरोड सोबत दि. 8 ऑगस्टच्या मध्यरात्री भोपाळ येथील महाराणा अपार्टमेंटकडून रचना नगर भुयारी पुलाखालून दुचाकीने जात असताना अचानक समोरुन आलेल्या दुसर्‍या दुचाकी स्वाराने त्यांच्या डोळ्यांवर मिरची पावडर टाकून जॅकी पथरोडच्या गळ्यावर व छातीवर चाकुने वार केले.

यात गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. हल्लयामुळे आरडाओरड ऐकल्यानंतर जवळच असलेल्या प्रिटींग प्रेस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली असता मारेकर्‍यांना पळ काढला.

याबाबत भोपाल एमम.पी.नगर पोलिसात आरोपी सुरेश अगरवाल याच्या विरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणी जया पथरोड यांच्यासह अन्य चार संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चार दिवसांपूर्वी मयत जॅकीने त्याच्या शालकास मारहाण केल्याचे वृत्त आहे.

जामनेर रस्त्यावरील अहिल्यादेवी कन्या विद्यालयाजवळ शहरातील प्रसिद्ध मल्ल मोहन बारसे पहेलवान यांचा सुमारे दोन वर्षांपूर्वी भररस्त्यावर खून करण्यात आला होता.

या खून प्रकरणातील संशयित आरोपी जॅकी पथरोड (वय 40) याची न्यायालयाने जामिनावर सुटका केल्यानंतर तो भोपाळ येथील गौतम नगर भागात पत्नीसह वास्तव्य करत होता.

भुसावळ येथील नट्टू चावरियाचा गोळीबार करुन खून केल्या प्रकरणाचा जॅकी पथरोड हा मुख्य प्रत्यक्ष साक्षीदार होता व लवकरच त्या खटल्याच्या सुनावणीस सुरुवात होणार होती.

त्यापूर्वीच जॅकीचा भोपाळ येथे निघृर्ण खून झाल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. घटनेची माहिती भुसावळात धडकताच वाल्मिक नगर भागात पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता.

रात्री उशीरापर्यंत त्याचा मृतदेह भुसावळ येथे आणण्यात आले नव्हते.

 

LEAVE A REPLY

*