जळगाव । दि.9 । प्रतिनिधी-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरु असलेले बार्टीचे स्पर्धा परिक्षा केंद्र एकही विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्याने गेल्या 6 महिन्यापासून बंद असल्याचा प्रकार कुलगुरु यांनी विभागाला भेट दिल्यानंतर उघडकीस आला. याबाबत उमवि प्रशासन देखील अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅड ट्रेनिंग इन्स्टिट्युट (बार्टी) तर्फे परिक्षा केंद्र सुरु करण्यात आले होते.

या परिक्षा केंद्राला राज्य व केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येते होते. स्पर्धा परिक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी बाहेरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन अनुदानातून निधी देण्यात येत असतो.

विद्यापीठाच्या स्कुल ऑफ आर्ट अ‍ॅण्ड ह्युमॉनिटी या विभागात सुरु करण्यात आलेल्या बार्टीच्या स्पर्धा परिक्षाकेंद्रा ठिकाणी बाहेरील तज्ज्ञांना मार्गदर्शनासाठी न बोलविता स्थानिक तज्ज्ञांना बोलविले.

त्यामुळे विद्यार्थ्यांना पुरेशी गुणवत्ता न मिळाल्याने स्पर्धा परिक्षा केंद्रातून गेल्या दोन वर्षात एकही विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण झाला नसल्याने बार्टीने परिक्षा केंद्र बंदाचे अनुदान थांबविले.

बार्टीचे स्पर्धा परिक्षा केंद्र बंद झाल्याने आर्थिक दुर्बल घटकातील विद्याथ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.

स्पर्धा परिक्षा केंद्र बंद आणि प्रशासन अनभिज्ञ
बार्टीचे स्पर्धा परिक्षा केंद्र एकही विद्यार्थी कुठल्याही परिक्षेत घवघवीत यश प्राप्त न करू शकल्याने स्पर्धा परिक्षा केंद्र बंद करण्याचा निर्णय बार्टीने घेतला. त्यानुषांगने बार्टीने गेल्या वर्षभरापासून स्पर्धा परिक्षा केंद्राला दिले जाणारे अनुदान थांबवले होते. याबाबत स्पर्धा परिक्षा केंद्राचे प्रभारी प्रमुख प्रा. रामटेके यांनी विद्यापीठ व बार्टीच्या प्रशासनाला कुठलीही वेळोवेळी माहिती पुरविली नसल्याने स्पर्धा परिक्षा केंद्र बंद बाबत प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

कुलगुरुची भेट आणि चावी गायब
विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्यासह प्रभारी कुलसचिव प्रा. ए.बी. चौधरी यांनी विद्यापीठातील स्कुल ऑफ आर्ट अ‍ॅण्ड ह्युमॅनिटी विभागात सुरु असलेल्या बार्टीच्या स्पर्धा परिक्षा केंद्राला भेट दिली. यावेळी स्पर्धा परिक्षा केंद्र बंद असल्याने प्रभारींनी चाबी हरविल्याचा बहाणा करून स्पर्धा परिक्षा केंद्र बंद असल्याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर कुलगुरुंना स्पर्धा परिक्षा केंद्र बंद झाले असल्याची माहिती मिळाली.

 

 

LEAVE A REPLY

*