मनपाचा 628 कोटी 24 लाखांचा अर्थसंकल्प मंजूर

0

जळगाव । दि.9 । प्रतिनिधी – महापालिकेची महासभा आज आयोजीत करण्यात आली होती. महासभेत गेल्या वर्षीचे सुधारित अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

दरम्यान सन 2017-18 या वित्तीय वर्षाचे 628 कोटी 24 लाखांचे अंजादपत्रक सादर करुन ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी अंदाजपत्रकात तरतुदी सुचवित असल्याच्या कारणावरुन रमेशदादा जैन व अश्विनी देशमुख यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी विशेष महासभा महापालिकेच्या सभागृहात महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

याप्रसंगी व्यासपिठावर उपमहापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित होते.

सभेच्या सुरवातील स्थायी समिती सभापती वर्षा खडके यांनी मनपाच्या सन 2016-17 या वर्षाच्या सुधारीत व सन 2017-18 या वित्तीय वर्षासाठी आयुक्त जीवन सोनवणे यांनी दि.20 फेब्रुवारी रोजी 593 कोटी 94 लाखाचे अंदाजपत्रक सादर केले होते.

यात 34 कोटी 30 लाखाची वाढ केली. त्यामुळे 628 कोटी 24 लाखाची वाढ केल्याचे खडके यांनी सांगीतले. दरम्यान अश्विनी देशमुख म्हणाल्या की, मनपातील अस्थापना विभाग व कर्जाच्या रक्केचे व्याज यावर वर्षभरात मनपाचे सुमारे 138 कोटी रुपये खर्च होत असतात.

त्यामुळे विकासकामे व नागरीकांच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी मनपाकडे निधीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे मनपाचे उत्पन्ना वाढविण्याची जबाबदारी कोणाची लोकप्रतिनीधी, नागरीक कि प्रशासनाची असा सवाल त्यांनी महासभेत अध्यक्षांपुढे मांडला.

तसेच उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी अंदाजपत्रकात कोत्याच प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही. अगामी काळात मनपाला उत्पन्न वाढवायचे असल्यास मनपाने म्युनिसिपल बाँड संकल्पना राबविली पाहीजे.

तसेच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणासाठी देखील कोणतीच तरतुद करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला बचतगटांसाठी महिलांच्या सक्षमिकरणासाठी मनपाने जेंडर बजेट अंतर्गत खान्देश कन्या बहिणाबाई अ‍ॅप तयार करायला पाहिजे.

जेणे करुन यातून बचतगटांनी तयार केले उत्पादन ऑनलाईन पद्धतीने त्याची विक्री करुन महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

 

 

 

 

LEAVE A REPLY

*