पाडळसे बामणोद रस्ताजवळील पाटाच्या पाण्यामध्ये अज्ञात माहिलेचा मृतदेह आढळला

0
 पाडळसे ता. यावल | |वार्ताहर  : येथुन बामणोद रस्ताजवळील हातनुर कालव्याच्या पाटा मध्ये आज दि ९ रोजी सकाळी १० वाजता शेतात कामावर जाणाऱ्या लोकांना अचानक पुलाच्या खाली एक अज्ञात २० ते२२ वर्ष ची महिला मृत अवस्थेत दिसल्याने खडबड उडाली.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व तात्काळ फैजपुर पोलीस स्टेशन कडवले तसेच येथील पोलीस पाटील यांनी ताबडतोब नागरीकांची मदतीने हि महिला कोण याची चौकशी केली मात्र हि मृत महिलेचे कोणीही ओळख पटवू शकले नाही.

तसेच घटना स्थळी फैजपुर पोलीस स्टेशन चे पि एस आय दत्तात्रय निकम यांनी तात्काळ मृत महिलेचा पंचनामा करून मृतदेह  पीएम साठी यावल येथे पाठवला.

या सर्व घटनेत मदत कार्य म्हणून पोलीस पाटील सुरेश खैरनार पोलीस, ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर तायडे, सामाजिक कार्यकर्ते नारायण कोळी, कासवा येथिल पांडुरंग कोळी, रज्याक सैय्यद, निसार सैय्यद, प्रशांत तायडे, प्रविण तायडे, प्रशांत सोनवणे, यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली तसेच सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली , पी एस आय , आधार निकुंभे , पी एस आय , रामलाल साठे ASI विजय पाचपोळे हे करत आहे

LEAVE A REPLY

*