Type to search

Breaking News मुख्य बातम्या

इस्रोकडून ‘रीसॅट-२बी’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Share

श्रीहरिकोटा :  भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने बुधवारी पहाटे ५ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘पीएसएलव्हीसी ४६’ चे यशस्वी प्रक्षेपण केले. तसेच, ‘पीएसएलव्हीसी ४६’ ने भारतीय रडार पृथ्वीची पाहणी करणारा ‘रीसॅट-२बी’ या उपग्रहास देखील ५५५ किलोमीटर उंच असलेल्या पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरित्या नेऊन ठेवले.

‘पीएसएलव्हीसी’ ची ही ४८ वी भरारी आहे. तर रीसॅट-बी हा उपग्रह मालिकेतील चैाथा उपग्रह आहे. या उपग्रहाची गुप्त पाहणी, कृषि, वन व आपत्ती व्यवस्थापनात मदत होणार आहे. या उपग्रहाचे वजन ६१५ किलो असून प्रक्षेपणानंतर केवळ १५ मिनीटातच त्याने पृथ्वीची पहिली कक्षा ओलांडली. रीसॅट-बी बरोबर सिंथेटिक अपर्चर रडार (सार) इमेजर देखील पाठवले आहे. यामुळे संचार सेवा कायम राहिल.

या अगोदर मंळवारी इस्रोचे चेअरमन के. सिवन यांनी तिरूपती व तिरूमला मंदिरात जाऊन इस्रोच्या परंपरेनुसार भगवान व्यंकटेश्वराची पूजा केली होती. आज या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर त्यांनी सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.

हा उपग्रह अंतराळात सोडण्यापूर्वी इस्रोचे चेअरमन के. सीवन यांनी तिरुपतीच्या तिरुमला मंदिरात जाऊन पूजा केली होती. कोणत्याही उपग्रहाला अवकाशात सोडण्यापूर्वी तिरुपतीच्या वेंकटेश्वर मंदिरात जाऊन पूजा करण्याची इस्रोची परंपरा असल्याने ही पूजा करण्यात आली.

या उपग्रहाद्वारे अंतराळातून जमिनीवरील ३ फुटापर्यंतचे फोटो घेता येणार आहेत.

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर या सीरिजचे सॅटेलाइट विकसित करण्यात आले होते.

या उपग्रहाचं वजन ६१५ किलोग्रॅम आहे, प्रक्षेपणानंतर हा उपग्रह १५ मिनिटाने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सोडण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!