गणवेशासाठी खाते न उघडणार्‍या बँकाविरुध्द कारवाई- सीईओ

0
जळगाव । प्रतिनिधी-इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेशासाठी बँकेत शुन्य रकमेवर खाते न उघडणार्‍या बँकाविरुध्द कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव देणार असल्याची माहिती सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या व नगरपालिकेच्या 1892 शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या सर्व मुली व एसस्सी, एसटी व बीपीएल कार्डधारक मुलांना सर्व शिक्षा अभियांनातंर्गत गणवेश देण्यात येतो.
यावर्षी लाभार्थी विद्यार्थ्यासह आईच्या नावे बँकेत खाते उघडून गणवेशाच्या 400 रुपयांचे अनुदान गणवेशाची बिले सादर केल्यानंतर थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

परंतू यासाठी लाभार्थ्यांला राष्ट्रीयकृत बँकेत 500 रुपयांचे बँक खाते उघडावे लागत आहे. शाळा सुरु होवून दिड महिना होवून देखील जवळपास 75 टक्के विद्यार्थी खाते न उघडल्याने तसेच गणवेशाची बिले न सादर केल्याने वंचित असल्याचे समोर आले आहे.

गणवेशासाठीचे 6 कोटी 38 लाखांचे अनुदान सर्व शिक्षा अभियानांतर्गत तालुकास्तरावर मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. तरी देखील विद्यार्थी गणवेशासाठी वंचित आहे.

शुन्य रकमेवर बँका लाभार्थ्यांचे खाते उघडत नसल्याने विद्यार्थी वंचित आहे. बँका शुन्य रकमेवर खाते उघडण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थी बँकेत खाते उघडले नसल्याने वंचित आहे.

याबाबत शिक्षण सामिती व स्थायी समितीच्या बैठकीत अनेक विद्यार्थी वंचित असल्याची माहिती समोर आली. याबाबत जिल्हाधिकारी यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँकाच्या अधिकार्‍यांची बैठक घेवून शुन्य रकमेवर विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यात यावे अश्या सुचना देण्यात आला होत्या.

तरी देखील बँका शुन्य रकमेवर खाते उघडण्यास टाळाटाळ करीत असल्याने विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहे. गणवेशासाठी सुचना देवनूही बँका ऐकत नसल्याने व गणवेशासाठी बँकेत शुन्य रकमेवर खाते न उघडणार्‍या बँकाविरुध्दची माहिती गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून घेवून कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव देणात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*