मुुंबई मराठा क्रांती मोर्चातील जळगावच्या समाजबांधवांनी घेतली नितेश राणेंची भेट

0
जळगाव | प्रतिनिधी | मुंबई येथे उद्या निघणार्‍या मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी मुुंबई येथे गेलेल्या कार्यकर्त्यांनी दादरच्या राजर्षी शाहू सभागृह शिवाजी मंदिर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या संपर्क कार्यालयात नितेश राणे यांची भेट घेतली.

या भेटीमुळे जळगावच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून कार्यकर्त्यांच्या घोषणानी परिसर दणाणून गेला आहे.

दरम्यान भुसावळ येथून २५ हजार कार्यकर्ते आज रात्री मुंबईकडे रेल्वेने रवाना होत असल्याची माहिती मुुंबई येथे गेलेले डॉ. राजेश पाटील यांनी दूरध्वनीवरून देशदूतला दिली.

LEAVE A REPLY

*