चोपड्यातून मराठा क्रांती मोर्चाला हजारो कार्यकर्ते रवाना

0
चहार्डी, ता.चोपडा | | वार्ताहर :  दि. ९ ऑगस्ट रोजी मुंबईत निघणार्‍या मराठा क्रांती मोर्च्यासाठी चोपडा शहर व तालुक्यातून हजारो कार्यकर्ते रवाना झाले असून,त्यादृष्टीने संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले असल्याची माहिती संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष संजीव सोनवणे यांनी संध्याकाळी देशदूतशी बोलतांना दिली.

मराठा क्रांती मोर्च्याच्या समर्थनार्थ तालुक्यात अनेक गावांत मराठा समाज बांधवांच्या बैठका घेण्यात येत आहेत.

त्यासाठी संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष संजीव सोनवणे,प्रमोद बोरसे,प्रा.संदीप पाटील,प्रा.शैलेश वाघ ,प्रा.दिनेश बाविस्कर,दिव्यांक सावंत, मुख्यमंत्री मित्र प्रकाश उर्ङ्ग पप्पू पाटील, सतिष बोरसे, यांचेसह आदी कार्यकर्ते गेल्या पंधरा दिवसापासून कामाला लागले आहेत.

आता पर्यंत चोपडा शहर,चहार्डी,घुमावल हातेड,लासुर,गणपूर,वेले आदी गावांना समाज बांधवांच्या बैठका घेण्यात आल्या.

दि.९ ऑगस्ट रोजी मुंबईत निघणार्‍या मराठा क्रांती मूक मोर्च्यासाठी चोपडा शहर व तालुक्यातून मराठा समाज बांधव आणि तरुण हजारोच्या संख्येने जाणार आहेत.

LEAVE A REPLY

*