Type to search

काहीही करा पण आम्हांला पाणी द्या… आसोदावासियांची आर्त हाक

तहानलेल्या असोदेकरांचे पाण्यासाठी जि.प.समोर आज धरणे आंदोलन

जळगाव

काहीही करा पण आम्हांला पाणी द्या… आसोदावासियांची आर्त हाक

Share

जळगाव । प्रतिनिधी :  कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेले आसोदा गावामध्ये सद्य:स्थितीला भीषण पाणीटंचाई सुरु आहे. गावात 23 ते 24 दिवसानंतर नळांना पाणी येण्याची शाश्वती सुद्धा नाही. जिल्हा प्रशासनाकडून एवढ्या प्रदिर्घ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोणताही ठोस कृती आराखडा तयार नाही. आसोदे गावासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यासाठी मागणी केली होती. मात्र गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी या संदर्भात उपाययोजना आजपर्यंत केलेल्या नाहीत. त्यामुळे आसोदा गावात भीषण पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे. याविरोधात मंगळवार दि.21 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या संदर्भात कोणतीही ठोस अशी उपाययोजना आजपावेतो न केल्याने आसोदेकरांना भीषण पाणीटंचाईत वार्‍यावर सोडलेले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासिनता व प्रशासनाचे दुर्लक्ष अशा परिस्थितीत संतापलेल्या आसोदेकरांनी जीवन कसे जगायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. मंगळवार दि.21 रोजी दुपारी 1 वाजता जळगाव जिल्हा परिषदेची सर्व साधारण सभा होत आहे. पाणीटंचाई निवारणाची जबाबदारी प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून जिल्हा परिषदेवर आहे.

परंतु जि.प.जळगावचे पाणीटंचाईकडे लक्ष वेधले जावे व पाणीटंचाई दूर करण्यास मुख्यमंत्री यांचे आदेशाप्रमाणे त्वरीत कार्यवाही व्हावी. यासाठी सर्वसाधारण सभेच्या वेळी दुपारी 1 वाजता समस्त आसोदेकर जळगाव जि.प.समोर धरणे आंदोलन करुन आसोदे गावाची पाणीटंचाई व रखडलेली योजना या संदर्भात त्वरीत उपाययोजना व्हावी, यासाठी उग्र आंदोलन करणार आहे. तरी सर्व आसोदे गावातील युवक, महिला व लोकप्रतिनिधी यांनी जळगाव जिल्हा परिषदेसमोर दुपारी 12 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक व ग्रामस्थांनी केले आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व किशोर चौधरी, राजेश चिरमाडे, प्रदीप भोळे, अजय महाजन, शकुंतला चौधरी, खेमचंद महाजन, सचिन चौधरी, महेंद्र नारखेडे, शरद नारखेडे, विमल चौधरी, संजय ढाके, मिलींद नारखेहे, संदीप नारखेडे, कौसल्या चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, संजीव पाटील, योगराज भोळे, धनराज कोल्हे, जितेंद्र भोळे, किरण महाजन, योगेश कोल्हे आदी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने संतापलेल्या असोदेकरांनी पाणी टंचाई विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
– किशोर चौधरी,  आसोदा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!