Type to search

जळगाव

जळगाव : कुसुंबा येथील तरुणाचा अतिमद्यसेवनामुळे मृत्यू

Share
स्थानिक गुन्हे शाखेचे जिल्ह्यात अवैध धंद्यावर छापे, Latest News Crime News Raid Ahmednagar

जळगाव | प्रतिनिधी

तालुक्यातील कुसुंबा येथील तरुणाचा अतिमद्यसेवनामुळे मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शरद नाना पाटील (वय ३३, रा. गणपतीनगर, कुसुंबा ता. जळगाव) हा तरुण एमआयडीसीतील पाइप कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्याला सहा महिन्यांपासून दारुचे व्यसन जडले होत. रविवारी सकाळी ९ वाजता कामावर जातो, असे सांगून तो घराबाहेर निघाला. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने पत्नी मनीषा आणि नातेवाईकांनी शोधाशोध केल्यानंतरही तो आढळला नाही. तो सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावातील शिवशाही हॉटेलच्या शेजारी असलेल्या चहाच्या टपरीजवळ मयत स्थितीत आढळून आले. त्यास नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात आणले. परंतु, त्याचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले. शवविच्छेदनानंतर  मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयताच्या पश्चात आई- वडील, पत्नी, मुलगा, मुलगी,  असा परीवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!