Type to search

जळगाव मुख्य बातम्या

जळगाव : कुसुंब्याजवळ डंपरची दुचाकीला धडक महिला ठार

Share
पिंपरी निर्मळच्या भाविकांचा गुजरातमध्ये अपघाती मृत्यू, Latest News Pimpari Nirmal Devotees Gujarat Accident Death Shirdi

जळगाव | प्रतिनिधी

जळगावला मोटारसायकलने येत असताना मागून येणार्‍या भरधाव डंपरने जोरदार धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना कुसुंबा बसस्थानकाजवळ बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. डंपर चालकाला ताब्यात घेतले असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुपाली भय्या पाटील (वय-२८, रा. लासुरे, ता. चोपडा ह.मु. विरार, मुंबई) या त्यांची मुलगी श्रेया भय्या पाटील (वय अडीच वर्ष) हिच्या सोबत कुसुंबा (ता. जळगाव) येथे काकांकडे मंगळवारी रात्री १२.३० वाजेला आल्या. रात्री मुक्काम केला. सकाळी भाऊ नीलेश दिलीप पाटील आणि बहीण प्रतीक्षा दिलीप पाटील यांच्यासह लासुरे येथे जाण्यासाठी बसस्थानकावर दुचाकीने येत असताना मागून भरधाव वेगाने येणार्‍या डंपर (क्र.एमएच १९ झेड ६४६५) ने जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलवर बसलेल्या रुपाली भय्या पाटील या मागच्या चाकात येवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी श्रेया पाटील, बहीण प्रतीक्षा पाटील आणि भाऊ नीलेश पाटील गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून  पंचनामा केला. जखमी झालेल्या तिघांना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मृत रूपाली पाटील यांचे लासूर (ता. चोपडा) हे मूळगाव असल्याने शेतीच्या खरेदीच्या निमित्ताने ते गावाकडे जात होतेे. त्यांचे पती मुंबईतील विरार येथे रेल्वेत नोकरीला आहे. अपघात झाल्यानंतर नागरिकांनी डंपर चालकाला पकडून त्यास एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!