Type to search

जळगाव

कृउबास संरक्षण भिंत बांधण्यासह पाण्याच्या दोन टाक्या बांधणार

Share

जळगाव । कृषी उत्पन्न बाजार समितीची संरक्षक भिंत पाडल्याप्रकरणी मार्केट यार्डच्या आडत व्यापारी असोसिएशनने सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत बेमुदत संप सुरुच ठेवण्याचा इशारा जळगाव कृउबा समिती यासाठी मंगळवार दि. 11 रोजी सकाळी 11 वाजता मार्केट यार्डच्या आडत व्यापारी असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीत लेखी आश्वासन आणि संरक्षण भिंतीचे काम सुरु झाल्याशिवाय मार्केट बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे व्यापार्‍यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची 7, शिवाजीनगर निवास्थानी आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भेट घेतली होती. मात्र, यावेळी सुरेशदादा जैन यांनी व्यापार्‍यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन केले.

तसेच यासंदर्भात जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून संरक्षक भिंतीसह दोन पाण्याच्या टाक्या, गुरांच्या पिण्याचा हाळ बांधून देण्यासह मार्केट यार्डच्या व्यापार्‍यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापारी यांच्यात झालेल्या वादावर अखेर पडदा पडला. त्यानंतर मंगळवारी दुपारपासून मार्केट पूर्ववत सुरु करण्यात आले. दरम्यान, कृउबा समितीची संरक्षण भिंत पाडण्यात आल्याने झालेले नुकसान, भर उन्हाळ्यात लावलेले ठिबकद्वारे 100 झाडे, उन्हाळ्यात बाहेरून येणार्‍या शेतकरी व नागरिकांसाठी अँक्वा फिल्टरचे थंडगार पाण्याची पाईपलाईन तुटल्यामुळे बंद पडली होती.गुरेढोरांसाठी पाणी पिण्यासाठी बांधलेला कुंड, पाण्याची टाकी, पुरुषासाठी बांधलेल्या दोन मुतारी यासह अनेक नुकसान झाले होते. ते पुन्हा उभारून देण्याचे आश्वासन विकासकाकडून मिळाल्याने संप मागे घेण्यात आला आहे.

विकासकाकडून हमी पत्र देण्याचे मान्य
कृउबा संरक्षण भिंत तोडण्यात आल्याप्रकरणी विकासकाकडून संरक्षक भिंतीसह दोन पाण्याच्या टाक्या, गुरांच्या पिण्याचा हाळ बांधून देण्यासह 100 झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच दोन मुतार्‍या, ठिबक सिस्टीम उभारणीसह इतर कामे विकासकाकडून करून देण्याचे हमी पत्र त्वरित देण्याचे मान्य केले. त्यानंतर संप मागे घेण्यात आला असल्याचे व्यापारी पदाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.

यांची होती बैठकीला उपस्थिती
8सुरेशदादा जैन यांच्या भेटीनंतर कृउबा व्यापार्‍यांचा संप अखेर मागे घेण्याचे मान्य केले. यावेळी मार्केट यार्ड असोसिएशनचे अध्यक्ष बाळकृष्ण बेहेडेे, उपाध्यक्ष शशिकांत बियाणी, संचालक नितीन बेहडे, सचिव सुनील तापडिया, कार्याध्यक्ष दीपक महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, अशोक राठी, रवींद्र दहाड, रवींद्र सूर्यवंशी, राजेंद्र जोशी, नीलाचंद जैन यांच्यासह व्यापारी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!