Wednesday, April 24, 2024
Homeजळगावजळगाव कृषी उत्त्पन्न बाजार समितीत नोंदणीकृत धारकांनाच एन्ट्री

जळगाव कृषी उत्त्पन्न बाजार समितीत नोंदणीकृत धारकांनाच एन्ट्री

जळगाव – Jalgaon :

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील गर्दी कोरोनाचा हॉटस्पॉट होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या सूचनेवरुन पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे,उपअधिक्षक कुमार चिंथा, उपायुक्त संतोष वाहुळे यांंच्यासह पथकाने पाहणी केली.

- Advertisement -

दरम्यान,येथील गर्दी टाळण्यासाठी केवळ नोंदणीकृत धारकांनाच एन्ट्री देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच टाईम झोन निश्तिच करण्यात आला असून प्रवेशद्वारावर पोलीसांचा पहारा असणार आहे.नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यास बुधवारपासून कारवाईचा इशारा उपायुक्त वाहुळे यांनी दिला आहे.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांचा माल खरेदी- विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या सूचनेनुसार पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे,उपअधिक्षक कुमार चिंथा, उपायुक्त संतोष वाहुळे ,एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह पथकाने सकाळी पाहणी करुन येथील व्यवस्थापना सूचना दिल्या.

गर्दी टाळण्यासाठी अशी केली वर्गवारी

कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारी गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला खरेदीसाठी तीन ठिकाणी जागा निश्‍चित करुन देण्यात आली आहे.लसून,अद्रक आणि बटाटे खरेदीसाठी सकाळी ११ ते २ ची वेळ देण्यात आली आहे.तर फळांच्या खरेदी-विक्रीसाठी गुरांच्या बाजाराची जागा निशिचत करुन देण्यात आली आहे. दोन्ही प्रवेशद्वार सुरु करण्यात आले असून एका प्रवेशद्वार जाण्यासाठी आणि दुसरे प्रवेशद्वार येण्यासाठी खुले करण्यात आले आहे.दोन्ही प्रवेशद्वारावर आता पोलीस तैैनात असणार आहेत.तसेच मनपाचे एक पथक देखील याठिकाणी राहणार आहे.

ऍटो-रिक्षांना परवानगी नाकारली

कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी केल्यानंतर वाहतूक करण्यासाठी ऍटो-रिक्षांची मोठी गर्दी होते. त्यामुळे आत आणण्यास मज्जाव करण्यात आले आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेर पार्कींग करण्याची सूचना देण्यात आली आहे.

मास्क न वापरणांर्‍यावर कारवाई

पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे, उपअधिक्षक कुमार चिंथा, उपायुक्त संतोष वाहुळे यांंच्यासह पथकाने कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी पाहणी केली. दरम्यान, मास्क न वापरणांर्‍यावर कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या