जिल्हाधिकार्‍यांसह महापौर विद्यार्थ्यांसोबत शाळेत बसतात तेव्हा…!

0

जळगाव । दि.3 । प्रतिनिधी – महानगरपालिकेकडून विकसीत करण्यासाठी सामाजिक संस्थांनी घेतलेल्या शाळांची पाहणी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर, महापौर नितीन लढ्ढा यांनी पाहणी केली.

दरम्यान अनुभूती स्कुलमध्ये गेल्यानंतर चक्क त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जावून खाली बसले. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थी देखील प्रभावी झाले.

मनपाकडून विकसीत करण्यासाठी जिल्हा बँक संचलित रामदास पाटील स्मृती ट्रस्ट यांना देण्यात आलेल्या पांझरापोळमधील जळगाव पब्लिक स्कुल, बालगंधर्व खुले नाट्यगृहावरील जैन उद्योग समूहसंचलित अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल आणि भोईटे माध्यमिक स्कुलची प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापौर नितीन लढ्ढा यांनी सकाळी पाहणी केली. दरम्यान, अनुभूती स्कुलमध्ये विद्यार्थ्यांसोबत भारतीय बैठक मांडून बसण्याचा त्यांना मोह आवरता आला नाही.

खान्देश सेंट्रलमध्ये पार्किंगसाठी पर्याय
रेल्वे स्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बॅरीकेटस् लावण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरात पार्किंगची समस्या उद्भवणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांसह महापौरांनी पाहणी केल्यानंतर खान्देश सेंट्रलच्या जागेत पार्किंगची पर्यायी व्यवस्था करण्याबाबत विचार सुरु असल्याचे महापौरांनी सांगितले.

मेहरुण तलावाच्या सभोवताल डांबरीकरण


शासनातर्फे रस्ते विकासासाठी 3 कोटी 75 लाखाचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. परंतु अमृतअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात येणार असल्याने रस्त्यांची कामे करु नये असे शासनाने आदेश दिले आहे. त्यामुळे प्राप्त झालेल्या निधीतून मेहरुण तलावाच्या सभोवताल चार किमीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. दि.9 रोजी होणार्‍या विशेष महासभेत मंजूरीसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

मनपातील दस्तऐवज सुस्थितीत ठेवण्याचा सूचना
महापालिकेच्या इमारतीतील अस्वच्छता असल्यामुळे 15 दिवसापूर्वी उपमहापौर ललित कोल्हे यांनी स्वच्छतेबाबत सूचना दिल्या होत्या. दरम्यान, सकाळी जिल्हाधिकारी निंबाळकर, महापौर नितीन लढ्ढा आणि उपमहापौर ललित कोल्हे यांनी इमारतीतील सर्व मजल्यांची पाहणी केली. यावेळी आठ दिवसात संपूर्ण दस्तऐवज सुस्थितीत करुन ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या. पाहणी करत असल्याची माहिती मिळताच कर्मचार्‍यांची चांगलीच दमछाक झाली.

टॉवर चौकात सुशोभिकरणाची पाहणी


शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टॉवर चौकाचे जैन उद्योग सूमहाच्या माध्यमातून सुशोभिकरणाचे काम सुरु आहे. दरम्यान, सकाळी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, महापौर नितीन लढ्ढा, जैन उद्योग सूमहाचे अध्यक्ष अशोक जैन, नगरसेवक गणेश सोनवणे, वास्तुविशारद शिरीष बर्वे, आशिष शाह, शहर अभियंता सुनिल भोळे, विद्युत विभाग प्रमुख एस.एस.पाटील यांनी पाहणी केली. त्यानंतर अजिंठा चौफुली व मेहरुण तलावाची देखील त्यांनी पाहणी करुन संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

 

 

LEAVE A REPLY

*