पर्यावरण रक्षण ही काळाची गरज – जिल्हाधिकारी

0
जळगाव । दि.1 । प्रतिनिधी-पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज झाली असून ही गरज ओळखून नागरीकांनी मोठया संख्येने वृक्ष लागवडीच्या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत आज जिल्हयातील वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना.उज्वला पाटील, विधान परिषद सदस्या स्मिता वाघ, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत रामदेववाडी येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, रामदेववाडीचे सरपंच संतोष राठोड, शिरसोली येथील बारी विद्यालयाचे हरित सेनेच्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 ते 7 जुलै दरम्यान जिल्ह्यात वृक्ष लागवडीची मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जळगाव जिल्हयाला 20.89 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात 23 लाख 66 हजार खड्डे तयार आहेत.

या कालावधीत शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था व नागरीकांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करुन ही मोहिम यशस्वी करावी.

त्याचबरोबर उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले घर, शाळा परिसरात प्रत्येकी पाच झाडे लावावीत, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले

.यावेळी रामदेववाडी येथील वनविभागाच्या क्षेत्रावर 27 हजार 500 वृक्ष लावण्यात येणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी एन. जे. पाटील यांनी दिली.

बारी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उस्फुर्त सहभाग
वृक्ष लागवड मोहिमेत शिरसोली येथील बारी विद्यालयाचे हरित सेनेचे विद्यार्थी उस्फुर्तपणे सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी झाडे लावा, प्रदूषण टाळा, झाडे लावा, झाडे वाचवा अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.

प्रशासकीय इमारत आवारात वृक्षारोपण
चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत येथील प्रशासकीय इमातर आवार (टप्पा क्रमांक 3) येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. उज्वलाताई पाटील व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, खान्देश चॅप्टरचे अध्यक्ष किशोर ढाके, उपाध्यक्ष नितीन इंगळे, महाराष्ट्र क्रेडाईचे जॉईट सेक्रेटरी प्रफुल्ल टावरे, अनिशभाई शहा, सेक्रेटरी ललीत भोळे, निर्णय चौधरी, धनंजय जकातदार यांचेसह कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेकरीता कृषी विभागाचे अनिल भोकरे, वनविभागाचे डी.आर.पाटील, एन. जे. पाटील, सहायक दुय्यम निबंधक सुनिल पाटील, सहकार विभागाचे धिरज पाटील, एल.सी.सी.आय.चे पुष्कर नेहते व डॉ. पवन भोळे यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

*