Thursday, April 25, 2024
Homeजळगावभोकर येथील बालकाचे अपहरण

भोकर येथील बालकाचे अपहरण

जळगाव – 

लग्न समारंभात मित्रांसोबत पंगतीत वाढत असताना घरी जावून येतो, असे सांगून घरी गेलेला 11 वर्षीय बालक घरी न पोहचता बेपत्ता झाला आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. अज्ञात व्यक्तीने या बालकाचे अपहरण केल्याच्या संशयावरून व गावातील दुकानदारांनी सांगितलेल्या दिलेल्या वर्णनानुसार अनोळखी संशयिताचे रेखाचित्र पोलिसांनी जारी केले आहे.

- Advertisement -

तालुक्यातील भोकर येेथे नवल गुमान सैंदाणे हे कुटुंबासह राहतात. मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करीत आहे. त्यांचा 11 वर्षीय मुलगा रोहित (राहुल) नवल सैंदाणे हा दि.12 रोजी गल्लीतील एका लग्नाच्या ठिकाणी गेला होता. त्या ठिकाणी पंगतीमध्ये तो मित्रांसोबत वाढण्याचे काम करीत होता. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास तो बालक त्याच्या मित्रांना ‘मी घरी जाऊन येतो’ असे सांगितले आणि तो लग्नाच्या मंडपातून बाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली. राहुलचे अपहरण झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्याचे निरिक्षक निशिकांत जोशी तपास करीत आहे. त्यांनी गावात जाऊन चौकशी केली असता दुकानदारांनी गावात एक अनोळखी तरूण दिसत होता अशी माहिती दिली. त्या संशयित अनोळखी तरुणाने दुकानावर येऊन पुडी आणि विडीही मागितली होती. त्यानुसार पोलिसांनी दोन वेगवेगळ्या दुकानदारांनी सांगितलेल्या वर्णनानुसार रेखा चित्र तयार केले. याबाबत बालकाचे वडिल नवल सैंदाणे यांनी तालुका पोलिसात अपहरणाची फिर्याद दिली आहे.

दरम्यान गावात आलेल्या अनोळखी तरुण शरिराने सडपातळ, उंची 5 फूट 3 इंच पिवळ्या रंगाचा टि शर्ट, चॉकलेटी रंगाची पॅन्ट असे वर्णन दुकानदारांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या