शाळेजवळून मुलीचे अपहरण

0
जळगाव । दि.21। प्रतिनिधी-शाळा सुरु होण्याला आठवडा होत नाही तोच शाळेजवळुन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना जळगाव घडली.
याप्रकरणी एका तरुणाविरुध्द शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, गेंदालाल मिल परिसरातील विद्यार्थीनी सुष्मीता नंदु वानखेडे (वय 14) ही शाळेत गेली होती.

दि.14 रोजी दुपारी 3 वाजता तीला तीच्या आत्याचा मुलगा आकाश रतन बोदडे याने फुस लावुन पळवुन घेवुन गेला. मुलीचा इतरत्र शोध घेतला असता ती मिळुन आली नाही.

याप्रकरणी आज शहर पोलीसांत पीडीत मुलीची आई अलका वानखेडे यांच्या फिर्यादीवरुन फुस लावुन बळजबरीने पळविल्याप्रकरणी आकाश याच्याविरुध्द भादंवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास पोउनि मनोज जानकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

*