जळगावात आजपासून काथार क्रिकेट लीग

0
जळगाव । जळगाव येथे मोनाली कामळस्कर फाऊंडेशनतर्फे काथार वाणी समाजातील मुलांसाठी ‘काथार क्रिकेट लीग’ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. 9 फेब्रुवारी व रविवार दि. 10 फेब्रुवारी रोजी सागर पार्क येथे करण्यात आले आहे.

या स्पर्धेत जळगावसह, नाशिक, औरंगाबाद, पुणे, पिंप्राळा, शिरसोली येथून एकूण 16 संघ सहभागी झालेले असून 2 महिला संघ सुद्धा या वर्षी प्रथमच सहभागी होत आहे. या स्पर्धेसाठी अजय कामळस्कर, राहुल हरणे, चंद्रकांत असोदकर, मनिष वाणी, प्रशांत बाविस्कर, शुभम वाणी, रुपेश वाणी, अभिलाश कामळस्कर आदी परीश्रम घेत आहे व संस्थापक नंदकिशोर कामळस्कर व अध्यक्ष सुधाकर वाणी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

*