Type to search

Featured जळगाव राजकीय

जळगाव : जि.प.वर भाजपाचे वर्चस्व ; अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील विजय

Share

महाविकास आघाडीला धक्का, १ भाजपा सदस्य अनुपस्थित तर कॉंग्रेससह दोन सदस्य फुटले

जळगाव – 

जिल्हा परीषदेवर भाजपाला सत्तेपासनू दुर ठेवण्याच्या महाविकास आघाडीच्या तंत्राला धक्का ३०  विरूद्ध ३५ अशी मते घेत भाजपाने अध्यक्षपदी आपली सत्ता अबाधीत ठेवली आहे.

जिल्हा परीषदेवर भाजपाच्या रंजना प्रल्हाद पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील यांनी विजय मिळविला आहे. या निवडीत भाजपाला ३५ सदस्यांनी पाठींबा दिला तर महाविकास आघाडीला ३० सदस्यांनी पाठींबा दिला. यात कॉंग्रेसचे दिलीप पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मिना पाटील व पल्लवी देशमुख हे सदस्य फुटले, तर भाजपावा एक सदस्य अनुपस्थित होते.

उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्हा परीषदेच्या अटीतटीच्या असलेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. जिल्हा परीषदेवर भाजपाने महिला अध्यक्षपदाच्या निमित्ताने सलग चौथ्यांदा विजय मिळविला आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!