Type to search

Featured जळगाव

जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केल्याचा (खोटा) मेसेज पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार

Share
Jalgaon

जळगाव

जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने जिल्हाधिकारी यांनी आवाहन केल्याचा मेसेज सोशल मिडीयाच्या माध्यमातून फारवर्ड केला जात आहे. यामुळे नागरीकांमध्ये अनेक गैरसमज निर्माण होऊ शकतो.

जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, आरोग्य विभाग किंवा इतर शासकीय विभागाकडू जे मेसेज येतात ते त्यांच्या शासकीय ग्रुपच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविले जातात.

जसेकी, जिल्हाधिकारी, तहसिलदार, जिल्हा आरोग्य विभाग, पोलीस विभाग यांचेकडून काही सूचना, परिपत्रक जनतेपर्यंत पोहचवायचा असेल तर ते शासकीय साईटवरून व त्यांच्या वैयक्तीक व्हॉट्‌सपग्रुपवरून मेसेज दिला जातो.

ग्रामीण भागातील जनतेपर्यंत हा मेसेज पोहचविण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच आदी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या मार्फत हा मेसेज दिला जातो. तसेच शासन प्रमाणीत वृत्तपत्र व त्यांच्या डिजीटल साईटवरून आलेल्या मेसेजवरच जनतेने विश्वास ठेवावा.

सध्या कोरोना व्हायरसची साथ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, नागरीकांना सहकार्य करण्याची विनंती करत आहे. आज देशावरच नाही तर संपूर्ण जगावर मोठे संकट आलेले आहे.

आलेले संकट लवकरात लवकर टळावे यासाठी प्रत्येक नागरीकाने सहकार्य करणे गरजेचे आहे. मात्र सद्यस्थितीत (जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केल्याचा उल्लेख करत (फेक मेसेज) फारवर्ड करून खोटी माहिती पसरविण्याचा प्रयत्न सोशल मिडीयात होऊ पहात आहे. अशा प्रकारचा मेसेज सध्या महाराष्ट्रात व्हायरल होत आहेत.

याबाबत सायबर सेलकडे तक्रार झाली असून असे मेसेज फॉरवर्ड करू नये. असे केल्यास संबंधीतांचा शोध घेऊन त्यांचेवर पोलीस कारवाई होणार आहे. याबाबत खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!