कायद्याच्या चौकटीत राहुनच संत मुक्ताईला कर्ज – आ.खडसे

0
जळगाव । दि.29 । प्रतिनिधी-जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकने संत मुक्ताई शुगर अ‍ॅण्उ एनर्जी लि. या साखर कारखान्याला दिलेले 51 कोटीचे कर्ज काद्याच्या चौकटीत राहूनच दिले असल्याचे माहिती जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक तथा माजी आ. एकनाथराव खडसे यांनी दिली.
जिल्हा बँक कार्यकारी मंडळाची बैठक अध्यक्षा अ‍ॅड. रोहीणी खडसे-खेवलकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आ.एकनाथराव खडसे, उपाध्यक्ष आ. किशोर पाटील, माजी मंत्री. गुलाबराव देवकर, आ. राजुमामा भोळे, अनिल भाईदास पाटील, तिलोत्तमा पाटील, वाडीलाल राठोड यांच्यासह कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते.

यावेळी बोलतांना आ. खडसे म्हणाले की, जिल्हयातील कारखाने सुरु राहिले पाहिजे अशी बँकेची भावना आहे. त्या अनुषंगानेच संत मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लि. या साखर कारखान्याला यंत्रसामु्रगी आधुनिकीकरण व 12.0 मेगावॅट क्षमतेच्यासह वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी 51 कोटी 25 लाख रुपयांचे मध्यम मुदतीचे कर्ज मंजुर करण्यात आले आहे.

कायद्याच्या 97 वी घटना पोटनियमातील दुरुस्तीनुसार जिल्हा बँकेला कर्ज देण्याचे अधिकार दिले आहे. त्यानुसारच वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज दिले असल्याची स्पष्टोक्ती आ. खडसे यांनी यावेळी केली.

तसेच कर्जाच्या मोबदल्यात मुक्ताई साखर कारखान्याकडून 90 कोटीचे गाहणखत तयार करून घेतले असून 13 टक्के व्याजदाराने कर्ज दिले आहे.

तसेच अडीच कोटीचे भागभांडवल मुक्ताई साखर कारखान्याकडून बिनव्याजी घेतले आहे. तसेच अ‍ॅड. रोहीणी खडसे कारखान्याच्या मालक अथवा सभासद नसल्याचेही आ. खडसे यांनी यावेळी सांगितले.

कारखान्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाहेरील एका सदस्याची नियुक्ती करण्याचे शासनाच्या नवीन अध्यादेशात म्हटले आहे. त्यानुसारच इनडिपेडंट डायरेक्टर म्हणून मुक्ताई साखर कारखान्याचे कामकाज पाहत असल्याचे अध्यक्ष अ‍ॅड. रोहीणी खडसे – खेवलकर यांनी सांगितले.

मधुकर साखर कारखान्याला 7 कोटी 25 लाखांचे कर्ज मंजुर
जिल्हयात मधुकर साखर कारखाना व संत मुक्ताई साखर कारखाना या दोन्ही कारखान्यांची स्थिती चांगली आहे. सहकार खात्याने व्यवसायिक दृष्टीकोन जोपासण्याच्या सुचना दिल्या असल्याने कारखान्यांना कर्ज देण्यास तयार आहे.

जिल्हयातील कारखाने सुरु राहावे असे बँकेला वाटत असल्यानेच मधुकर साखर कारखान्याला 7 कोटी 25 लाखांचे कर्ज कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मंजुर करण्यात आले असून यात कर्मचार्‍यांचा एक महिन्याचा पगार देखील होणार आहे.

वसंत साखर कारखान्याच्या विक्रीची ऑनलाईन प्रक्रिया
डबघाईस असलेल्या वसंत साखर कारखान्यांच्या विक्रीची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. यासाठी ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव मागविण्यात आली आहे.

तसेच बेलगंगा साखर कारखान्यामधील साखरेचा साठा विक्रीचा करण्याचा प्रस्तावासाठी देखील ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कर्जमाफीसाठी पात्रताधारक शेतकर्‍यांच्या यादया तयार करण्याच्या सूचना
राज्य शासनाने दिड लाखापर्यंतचे कर्जमाफीचा निर्णय घेतला असून थकबाकीदार व पुर्नगठीत शेतकर्‍याचा याद्या तयार करण्याच्या सुचना अधिकार्‍यांना या बैठकीत देण्यात आल्या. त्यानुसार शेतकर्‍यांना 25 हजारापेक्षा अधिक सुट देण्यात येणार असल्याची माहिती आ. खडसे यांनी दिली.

राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव
राज्य सरकारने दिड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतल्याने जिल्हा बँकेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत राज्य सरकारच्या अभिनंदनचा ठराव करण्यात आला. यावेळी 25 हजारापेक्षा अधिक सुट मिळावी अशी सुचना संचालक मंडळाने केल्या आहे.

 

 

LEAVE A REPLY

*