कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या

कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या
येथील फुकट पुरा वस्तीत वास्तव्यास असलेल्या भील समाजातील कुटुंब हे मासे पकडण्यासाठी येथून जवळच असलेल्या जंगिपुरा येथे सोनद नदीवरील पाणी साठवण तलावात गेले असता नवरा-बायकोमध्ये वाद वाढून पतीने पत्नीची पाण्यात बुडवून हत्या केली आहे. तर आरोपी पती यास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रकाश मोरे राहणार वावडदा तालुका जळगाव त्याची पत्नी मंगलाबाई मोरे या दोघांमध्ये कौटुंबिक कलह सुरू होता त्यामुळे सो मंगलाबाई यांच्या माहेरी मंडळींनी घेऊन आलेले होते. त्यामुळे येथील फुकट पुरा वस्तीमध्ये वास्तव्यास होते.
दिनांक 1 जून रोजी येथून जवळ असलेल्या जंगिपुरा शिवारामध्ये पती पत्नी हे दोघेजण साठवण तलावात मासे पकडण्यासाठी गेले असता दोघ पती-पत्नीमध्ये भांडण होऊन रागाच्या भरात पतीने पत्नीला पाण्यात बुडवून ठार केले. आणि तिथून सरळ पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना सर्व हकीकत कथन केली.
परंतु सायंकाळपर्यंत दोघेजण घरी न आल्याने महिलेचा भाऊ गजानन गायकवाड त्याने चौकशी केली असता त्याला त्याच्या भाचीला सांगितले की, मला वावडदा वरून फोन आला होता की, माझ्या मायला माझ्या बापाने पाण्यात बुडवून मारले आहे. यावरून कुटुंबातील मयत महिलेचा भाऊ मुलगा मुलगी बहिण आणि इतर सदस्य यांनी त्वरित जंगिपुरा शिवारातील सोनद नदीवरील साठवण तलाव गाठला आणि पाण्यात उतरून बघितले असता सौ मंगलाबाई या मृत झाल्याचे समजले.  त्यांनी पोलीस स्टेशन गाठत खुनाची माहिती दिली.
पहूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी व शेंदुर्णी दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे हे कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. आणि ग्रामस्थांच्या मदतीने मयंत मंगलाबाई मोरे यांना पाण्यातून बाहेर काढले.
या चौकशी दरम्यान पति नामे प्रकाश मोरे हा स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला आणि त्याने सर्व हकीकत सांगितले त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे.यावरून मयत महिलेचा भाऊ गजानन जनार्दन गायकवाड वय वर्ष 30 रा शेंदुर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश मोरे याच्यावर 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे हे करीत आहे.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com