Type to search

जळगाव

आजोबाचा दशक्रिया विधी : नातवाचा बुडून मृत्यू

Share

जामनेर । तालुक्यातील वाकी खुर्द येथील नदीवर आजोबाचा दशक्रिया विधी सुरू असताना कुटुंबातील लोकांसोबत आलेला 11 वर्षीय नातू संतोष बाजूलाच असलेल्या केटीवेअरच्या बाजूला असलेल्या डोहाजवळ गेला. मात्र त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.

मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मयत संतोष बर्‍हाट हा त्याचे आजोबा वसंत एकनाथ बर्‍हाट यांच्या दशक्रिया विधी करण्यासाठी वाकी खुर्द येथील नदीवर त्याचे कुटुंबांसोबत आला होता. परिवारातील लोक विधी करण्यात व्यस्त असतांना तो बाजूला बसलेल्या केटीवेअरच्या बाजूला असलेल्या डोहा जवळ गेला त्याच क्षणी पाय घसरून तो पाण्यात पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला.

संतोषचे वडील हे भोपाळ येथे मजूरी करतात. गावात काम मिळत नसल्याने ते परिवारासह सध्या भोपाळ येथे रहातात. त्यांना एक मुलगी व 11 वर्ष वयाचा संतोष अशी दोन मुले होती. वडीलांचे निधन झाल्याने ते काही दिवसांसाठी गावाकडे वाकी खूर्द येथे आले होते. याबाबत जामनेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!