Type to search

जळगाव

शेतात गुरे चारली म्हणून बालकाला विष पाजले

Share

जामनेर । गंगापुरी येथील शिवाजी श्रीराम बारेला हा दहा वर्षांचा मुलगा आपल्या शेतामध्ये गुरे चारण्यासाठी गेला होता. तेव्हा ही गुरे शेजारच्या शेतामध्ये घुसली व त्यांनी सोयाबीन पिकाचे नुकसान केले. यामुळे त्या शेताचे मालक असलेले तिघांनी शिवाजीला नदीच्या काठावर नेऊन बळजबरी विष पाजून त्याची हत्या केली, असा आरोप शिवाजीचे वडील श्रीराम बारेला यांनी केला आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.

गंगापुरी येथील श्रीराम बारेला हे शेती करतात. त्यांना चार मुली व तीन मुले पत्नी असा परिवार आहे. त्यांचा 10 वर्षाचा मुलगा शिवाजी श्रीराम बारेला मंगळवारी सकाळी दहा वाजता गुरे चारण्यासाठी शेतात गेला. त्याची काही गुरे शेजारच्या सोयाबीन पेरलेल्या शेतामध्ये घुसून त्यांनी काही पिकाची नासाडी केली. यामुळे शेतमालक कमोल वेरसिंग बारेला (वय40), रामदास गिलदार बारेला (वय44), अमोल बेरसीग बारेला (वय45) या तिघांनी श्रीरामच्या घरी जाऊन वाद घातला.

दुपारी दोन वाजेच्या सुमारास या तिघांनी गुरे चारणार्‍या शिवाजीला सुर नदीच्या पलीकडील काठावर नेले. त्या ठिकाणी बळजबरी फवारणीचे विष पाजले. शिवाजीला विष पाजत असताना त्याची 12 वर्षाची बहीण रिंगु व त्याचा लहान भाऊ विक्रांत उपस्थित होता, असे शिवाजीचे वडील श्रीराम बारेला यांनी पत्रकारांना सांगितले. विशेष म्हणजे तिघे आरोपी शिवाजीचे नातेवाईक आहे. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशीरापर्यन्त गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते .

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!