Type to search

Breaking News Featured जळगाव फिचर्स

जळगावमधील “त्या’ कोरोना बाधिताच्या बहिणीसह सात जणांना जामनेरातून घेतले ताब्यात

Share
मालुंजे : 11 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह ; आश्वीच्या 22 क्वारंटाईन व्यक्तींना सोडले घरी, Latest News Corona Report Negative Ashwi
जळगाव येथील ४९ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या भावाची भेट घेण्यासाठी जामनेरहुन त्याची बहीण, मेव्हणा, मुले, मुली आदी काही जण माहेर असलेल्या मेहरुण येथे त्याच्या घरी गेले होते. एकदोन दिवसानंतर पुन्हा तो परिवार जामनेरला परतला.
जळगावातील मेहरूण भागातील सौदीअरब व दुबईहून परतलेल्या इसमाचा कोरोना वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून, त्याच्या संपर्कात आलेल्यांचा प्रशासनाकडून कसून शोध घेतला जात आहे. असे असतांनाच,”त्या” इसमाच्या बहिणीसह सुमारे सात संशयितांना विलगीकरणासह पुढील वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यासाठी जळगाव रवाना करण्यात आले आहे.
जळगाव येथील ४९ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या भावाची भेट घेण्यासाठी जामनेरहुन त्याची बहीण, मेव्हणा, मुले, मुली आदी काही जण माहेर असलेल्या मेहरुण येथे त्याच्या घरी गेले होते. एकदोन दिवसानंतर पुन्हा तो परिवार जामनेरला परतला. यासर्व गडबड गोंधळात झालेल्या गाठीभेटीनंतर अनेकांशी संपर्क झाल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे तहसीलदार अरुण शेवाळे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनय सोनवणे, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, डॉ. वैशाली चांदा आदींनी त्या परिवाराला समजावले आणि लागलीच पुढील वैद्यकीय देखरेख व उपचारासाठी जिल्हा उपरूग्णालयाच्या वाहनातून जळगाव येथे रवाना केले.
विशेष म्हणजे जळगावहून हा परिवार एका डेलीसर्वीसच्या ट्रकमधे बसून शहरात दाखल झाला होता. त्यामुळे संबंधित गाडीच्या चालकाचीही माहिती घेतली असता, चालक भीतीपोटी गायब झाला. तर त्या गाडीवरील क्लीनरला मात्र त्या परिवार सोबतच जळगाव रवाना केले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!