जामनेर तालुक्यास्तरीय फुटबॉल स्पर्धेत अंजुमन शाळेला दुहेरी मुकुट

0
जळगाव । वि.प्र. – लॉर्ड गणेशा स्कूल, जामनेर येथे तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत अंजुमन शाळेने दुहेरी मुकुट प्राप्त केला.

या स्पर्धेमध्ये 14, 17, 19 वर्ष वयोगट मुले व मुलींचे एकूण 12 संघ सहभागी झाले होते. 14 वर्ष वयोगटात अंतिम सामन्यात अंजुमन स्कूलने लॉर्ड गणेशा शाळेचा 2-0 गोलने पराभुत केले. तसेच 17 वर्ष वयोगटात अंतिम सामन्यात अंजुमन स्कूलने लॉर्ड गणेशा शाळेचा 3-0 गोलने पराभूत करून दोन्ही गटात विजेतेपद पटकावले.

LEAVE A REPLY

*