राजकीय दबावामुळे खातेवाटपाची सुनावणी लांबणीवर

0
जळगाव । दि.27 । प्रतिनिधी-जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या नियमबाह्य खातेवाटपाची विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. या खातेवाटपाची आज नाशिक येथे विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होती.
याबाबत कुठल्याही प्रकारची सुनावणी होवून निर्णय न झाल्याने या सुनावणीवर जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांचा दबाव असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
दरम्यान आठ दिवसांत सुनावणी न झाल्यास विभागीय आयुक्तांविरुध्द खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा तक्रारदाराने दिला आहे.

जि.प.च्या अध्यक्ष उज्वला पाटील यांनी विषय समित्यांची नियमबाह्य खातेवाटप केली होती. महिला व बालकल्याण सभापती रजनी चव्हाण यांच्याकडे पदभार असतांना बांधकाम समितीचे पद देवून जिल्हा परिषद अधिनियमातील तरतुदींचा भंग करून नियमबाह्य पध्दतीने खातेवाटप केली.

त्यानुषंगाने भाजपच्या सदस्य पल्लवी सावकारे यांनी याबाबत आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेवून मागील आठवडयात अध्यक्ष, बांधकाम समिती सभापती, सीईओ यांना सुनावणीसाठी नाशिक येथे बोलविले होते.

यावेळी अध्यक्षांच्यावतीने वकीलांने बाजू मांडून आठ दिवसांची मुदत मागितली होती. त्यानुषंगाने आज दि.27 रोजी सुनावणी होणार होती.

परंतू आज विभागीय कार्यालयात कुठलीही सुनावणी झाली नाही. दरम्यान विभागीय कार्यालयातील अधिकार्‍यांनी सुनावणीबाबत राजकीय दबाव असल्याचे तक्रारदारांना सांगितले.

खंडपीठात याचिका दाखल करणार
विषय समित्यांच्या खातेवाटपाची सुनावणी आठ दिवसात न झाल्यास विभागीय आयुक्तांविरुध्द खंडपीठात याचिका दाखल करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी दिला आहे.

बांधकाम समितीचे अधिकार गोठविण्याबाबत आयुक्तांकडे तक्रार
जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या सभापती रजनी चव्हाण यांचे अधिकार सुनावणी होईपर्यंत गोठविण्यात यावे अशी तक्रार जि.प.सदस्य जयपाल बोदडे यांनी आयुक्तांकडे दि.27 रोजी केली आहे.

 

LEAVE A REPLY

*