दिंडीद्वारे समतेचा संदेश

0
जळगाव । दि.26 । प्रतिनिधी-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन प्रांगणातून समता दिंडी काढण्यात येवून सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.
यावेळी दिंडीतून समतेचा संदेश देण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन प्रांगणातून समता दिंडीस प्रारंभ झाला. या दिंडीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उज्वला पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर दिंडीला सुरवात झाली.

यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, सहाय्यक समाजकल्याण आयुक्त खुशाल गायकवाड, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या अधिकारी अनिता राठोउ, शिक्षणविस्तार अधिकारी बळीराम धाडी, मनपाचे सहाय्यक लेखाधिकारी चंद्रकांत वांद्रे यांच्यासह शालेय विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

समता दिंडीत दिशा बहुउद्देशीय संस्थेचा प्रचार रथ व पथनाट्य सादर करणारे कलाकार दिंडीत अग्रभागी होते. समता दिडीं शहरातील प्रमुख रस्ताने घोषण देत, मार्गक्रमण करीत जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहु महाराज सभागृहात पोहचल्यानंतर समता दिडींचा समारोप करण्यात आला.

 

 

LEAVE A REPLY

*