सीईओ, एसीईओ नसल्याने जलव्यवस्थापन समितीची सभा तहकूब

0
जळगाव । दि.21 । प्रतिनिधी-जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची सभा आज शाहु महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
परंतु यासभेला मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर उपस्थित नसल्याने सदस्यांनी सभा तहकुब करावी अशी मागणी केली.
दोन्ही अधिकारी उपस्थित नसल्याने जलव्यवस्थापन समितीची सभा तहकुब करण्यात आली. दरम्यान आज स्थायी समितीची सभा होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जलव्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यत आली होती.

या बैठकीला विषय समित्यांच्या सभापतीसह सर्व सदस्य उपस्थित होते. परंतु या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर देखील उपस्थित नव्हते.

दरम्यान सीईओ जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीसीसाठी गेले असल्याने तसेच एसीईओ सुट्टीवर असल्याने सचिव म्हणून लघुसिंचन विभागाचे अधिकारी नाईक यांच्याकडे जलव्यवस्थापन समित्या बैठकीची अधिकृत जबाबदारी देण्यात आली होती.

दरम्यान सदस्यांनी सभेला दोन्ही मुख्य अधिकारी उपस्थित नसल्याने बैठकीत कुठलेही महत्वपूर्ण निर्णय होवू शकणार नाही असे सांगून सभा तहकुब करण्यात यावी असे सांगितले.

दरम्यान जलव्यवस्थापन समितीच्या सदस्या पल्लवी सावकारे व लालचंद्र पाटील यांनी अध्यक्षांचा अधिकार्‍यांवरील वचक संपला असून सभेला एकही मुख्य अधिकारी उपस्थित नाही ही सभागृहाची शोकांतिका असल्याचे सांगितले.

 

LEAVE A REPLY

*