प्रभाग 36चा सफाई ठेका रद्द करण्यासाठी षडयंत्र

0
जळगाव । दि.19 । प्रतिनिधी-शहरातील प्रभाग क्र.36 मध्ये दरमहा 2 लाख 78 हजार रकमेत सहजीवन स्वयंरोजगार सेवासहकारी संस्थेला साफसफाईचा ठेका दिला आहे.
मात्र हा ठेका रद्द करण्यासाठी षडयंत्र सुरु आहे. नगरसेविका अश्विनी देशमुख यांचे पती विनोद देशमुख हे मनपा अधिकार्‍यांवर दबाव टाकून तसेच आर्थिक बाबी पूर्ण न केल्यामुळे संगनमताने मक्ता रद्द करण्यासाठी आणि काळ्या यादीत टाकण्यासाठी कट रचल्याचा आरोप सहजीवन स्वयंरोजगार सेवासहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा ठेकेदार किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

चौकशीसाठी लेखापरिक्षकांचा नकार
प्रभाग क्रमांक 36 चा सफाईचा ठेका रद्द केला. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी प्रशासनाने स्थगिती दिली. चौकशीसाठी लेखापरिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी लेखापरिक्षकांनी चौकशीसाठी नकार दिला असल्याचे अध्यक्ष तथा ठेकेदार किरण पाटील यांनी सांगितले.

प्रभागातील स्वच्छता दूतांची बेकायदेशिर निवड
मनपाने 22 प्रभागांमध्ये सफाईचे ठेके दिले आहे. मात्र प्रभाग 36 मध्येच स्वच्छता दूत म्हणून मिलिंद सोनवणे, अनिल सोनार, मुविकोराज कोल्हे यांची आरोग्य अधिकार्‍यांनी निवड केली. ही निवड बेकायदेशिर असल्याचे पाटील यांनी सांगितले.

अधिकार्‍यांवर दबाव टाकून दंड आकारणी
विनोद देशमुख, मिलिंद सोनवणे, आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील, आरोग्य अधिक्षक एच.एम.खान यांच्या आर्थिक बाबीची पूर्तता न केल्याने संगनमताने ठेका रद्द करण्यासाठी कट रचल्याचा आरोप किरण पाटील यांनी केला. तसेच अधिकार्‍यांना हाताशी धरुन दंड आकारणी करण्याबाबत विनोद देशमुख हे धमकवित असल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला.

अधिकार्‍यांकडून आयुक्त, उपायुतक्तांची दिशाभुल
ठेका रद्द करण्यासाठी आणि काळ्या यादीत टाकण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी आयुक्त, उपायुक्तांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे आयुक्तांनी चार महिन्याचे देयके थांबविल्याने कामगारांचे पगार थांबले आहे. त्यामुळे थकीत देयके द्यावीत, अशी मागणी किरण पाटील यांनी केली. पत्रकार परिषदेत मिलिंद चौधरी, रमेश चौधरी, उमेश गवळी, विनोद मराठे, धनराज चौधरी उपस्थित होते.

10 हजार नागरिकांमध्ये दोघांचीच तक्रार
प्रभाग 36 मध्ये जवळपास 10 हजार नागरिक आहेत. साफसफाई झाली नसती तर अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या असत्या. मात्र नगरसेविका अश्विनी देशमुख आणि त्यांचे पती विनोद देशमुख यांच्याच तक्रारी असल्याचे किरण पाटील यांनी सांगितले.

 

 

LEAVE A REPLY

*