हगणदारीमुक्तीसाठी मोफत वाय-फाय

0
जळगाव । दि.29 । प्रतिनिधी-गणपतीनगरातील रस्त्याच्या कडेला रस्त्यावर उघड्यावर शौचास बसू नये यासाठी मनपा प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात आल्या.
मात्र त्याचा काही फायदा होत नसल्याने त्याठिकाणी आता बाके ठेवून दोन तास वाय-फायची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मनपा आणि मराठी प्रतिष्ठानतर्फे याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
जळगाव शहर हगणदारीमुक्ती होण्यासाठी प्रशासनातर्फे उघड्यावर शौचास बसणार्‍या ठिकाणांची सर्वेक्षण करुन यादी करण्यात आली.

शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्या अनुषंगाने शहर हगणदारीमुक्त झाल्याच्या दावा प्रशासनाने केला.

त्यानंतर शासनाच्या समितीने शहराची पाहणी केली. मात्र त्यांना 58 ठिकाणांपैकी अनेक ठिकाण हगणदारीमुक्त झाले नसल्याचे निदर्शनास आले.

त्याबाबतचा समितीने अहवाल देखील दिला आहे. शिरसोली नाका चौकातील गणपतीनगरातील रस्त्याच्या कडेला शौचास बसू नये, यासाठी संरक्षण भिंत उभारण्यात आली होती.

मात्र ही भिंत देखील तोडली गेली. त्यामुळे आता त्याठिकाणी सुशोभिकरण करुन नागरिकांसाठी बाके ठेवून दोन तास वाय-फायची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय देण्यात आला.

वाय-फायमुळे आळा बसेल. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*