भूमीगत गटारींच्या निविदा प्रक्रियेला मुदतवाढीची शक्यता

0
जळगाव । दि.27 । प्रतिनिधी-अमृतअंतर्गत भूमीगत गटारींसाठी 131 कोटीची निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे. दरम्यान, निविदा प्रक्रियेतील काही त्रुटींबाबत चर्चा करण्यासाठी आयुक्त जीवन सोनवणे यांच्या उपस्थितीत बैठक झाली आहे.
निविदा मागविण्यासाठी दि.12 जुलैपर्यंत मुदत असून पुन्हा मुदत वाढ होण्याची शक्यता आहे.

भूमीगत गटारींसाठी निविदापूर्व बैठक झाली. या बैठकीस मनपा आयुक्त जीवन सोनवणे, प्रभारी शहर अभियंता सुनिल भोळे, प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, योगेश वाणी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता श्री.कालिंके, श्री.निकम, उपअभियंता श्री.नेमाडे यांच्यासह निविदाधारक उपस्थित होते.

भूमीगत गटारींसाठी निविदा मागविण्यात आला असून त्याची मुदत दि.12 जुलैपर्यंत देण्यात आली आहे. निविदांमधील अटी-शर्तींवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती.

यावेळी काही अटी-शर्ती आणि त्रुटींबाबत उपस्थित शंकांचे निरसन करण्यात आले. निविदा मागविण्याची दि.12 जुलैपर्यंत मुदत दिली असून निविदासाठी मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे.

 

LEAVE A REPLY

*