सागरपार्कवर जॉगिंग ट्रॅक

0
जळगाव । दि.19 । प्रतिनिधी-सागरपार्कच्या जागेवर संरक्षण भिंत बांधून जॉगिंग ट्रॅक करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडून मिळालेल्या अनुदानातील निधीचा वापर केला जाणार असल्याची माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली.
शहरातील सागरपार्कच्या जागेची मालकी मनपाची असलेल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. सागरपार्कवर सिवीक सेंटरचे आरक्षण असले तरी त्याचा विकास लगेच करणे शक्य नाही.

त्यामुळे तोपर्यंत ही जागा सुरक्षित राहवी, नागरिकांना फिरता यावे, यासाठी संरक्षण भिंत बांधून जॉगिंग ट्रॅक, हायमस्ट लँपसह सभोवताल वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

याबाबत महासभेत निर्णय देखील घेतला जाणार असल्याचे महापौर नितीन लढ्ढा यांनी सांगितले. सागरपार्क मैदानाच्या सुरक्षितेसाठी त्यास संरक्षक भिंत बांधून एक मोठे प्रवेशद्वार करण्यात येईल.

रात्री गेट बंद करण्यात येईल आणि दिवसभर नागरिकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. तसेच कंपाऊंडच्या बाहेर मैदानाच्या सभोवताल वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

विशेष अनूदानातील निधीतून कामे
शासनाकडून मनपाला मुलभूत सुविधांसाठी 5 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. त्यात महापालिकेचे 5 कोटी असून एकूण 10 कोटी रुपयांच्या विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. यात विशेषत: रस्त्यांची कामे होती. मात्र अमृतच्या पाणीपुरवठा योजनेमुळे रस्त्यांची कामे करु नये? असे शासनाने आदेश दिले आहे.

त्यामुळे तो निधी सागरपार्कसाठी वापरण्या येणार आहे. याबाबत उद्या होणार्‍या महासभेत आयत्यावेळीच्या विषयावर चर्चा केली जाणार आहे.

 

LEAVE A REPLY

*