लिलावाला सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांचा विरोध

0
जळगाव । दि.31 । प्रतिनिधी-मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील गाळे दोन महिन्याच्या आत ताब्यात घेण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने निर्देश दिले आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी गाळेधारकांची सुनावणी सुरु आहे. दरम्यान, सुनावणीअंती स्पर्धात्मक लिलावाला विरोध करुन रेडीरेकनरनुसार भाडे व प्रिमीयम देण्याबाबत तयार दर्शविली. याप्रकरणी उद्या दि.1 रोजी अंतिम युक्तीवाद होणार आहे.

मनपा मालकीच्या 28 व्यापारी संकुलांपैकी 18 व्यापारी संकुलातील 2175 गाळ्यांची मुदत एप्रिल 2012 रोजी संपुष्टात आली. गाळे ताब्यात घेण्यासाठी 81 ब ची नोटीस देवून सुनावणी घेण्यात आली होती.

2175 पैकी 665 गाळेधारकांची सुनावणी होवून अंतिम आदेश देण्यात आले होते. उर्वरित 1520 गाळेधारकांची सुनावणी झाली नव्हती.

दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाने 15 दिवसात प्रक्रिया सुरु करुन दोन महिन्यात गाळे ताब्यात घ्यावे, असे निर्देश दिले. खंडपीठाचे निर्णयानुसार प्रक्रिया करण्यासाठी उर्वरित 1520 गाळेधारकांची सुनावणी घेण्यात येत आहे.

दरम्यान, आज सेंट्रल फुले मार्केट, शास्त्री टॉवरमधील 418 गाळेधारकांची सुनावणी झाली. गाळेधारकांतर्फे अ‍ॅड.दिलीप मंडोरा, अ‍ॅड.एस.बी.अग्रवाल, अ‍ॅड.ज्योती भोळे यांनी युक्तीवाद केला.

दरम्यान, सुनावणीबाबत गाळेधारकांच्या वकीलांनी हरकत घेतली. तसेच स्पर्धात्मक लिलावाला विरोध करुन चालू रेडीरेकनरनुसार भाडे व प्रिमियम आकारणी करण्याबाबत सेंट्रल फुले मार्केटमधील काही गाळेधारकांनी तयार दर्शविली आहे.

याप्रकरणी उद्या दि.1 रोजी अंतिम युक्तीवाद होणार आहे. दुपारी छत्रपती शाहू महाराज संकुलातील 139 गाळेधारकांची सुनावणी झाली.

सुनावणी पूर्ण झाल्यानंतर व संबंधित गाळेधारकांना नोटीस बजावल्यानंतर गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे मनपा सुत्रांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*