जीएसटीपोटी महानगरपालिकेला 8 कोटी 74 लाखाचे अनुदान

0
जळगाव । दि.4 । प्रतिनिधी-देशभरात 1 एप्रिल पासून सर्व कर रद्द करुन जीएसटी ही करप्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एलबीटी अनुदाना ऐवजी शासनाकडून जीएसटीचे अनुदान वितरीत केल्या जात आहे.
त्यानुसार शासनाकडून जळगाव महापालिकेला 8 कोटी 74 लाखाचे अनुदान वितरीत झाले आहे.

राज्यातील महानगरपालिकांमध्ये पूर्वी एलबीटी लागू करण्यात आली होती. त्यानंतर 1 एप्रिल 2015 पासून एलबीटी रद्द करुन केवळ 50 कोटी पेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यवसायिकांकडून आकारणी केली जात होती.

एलबीटी रद्द केल्याने शासनाकडून त्या पोटी अनुदान दिले जात होते. आता 1 एप्रिल पासून जीएसटी करप्रणाली लागू झाल्याने एलबीटी ऐवजी जीएसटीचे अनुदान देण्यात येत आहे.

त्यामुळे जळगाव महानगरपालिकेला शासनाकडून 8 कोटी 74 लाखाचे अनुदान वितरीत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*