दोन दिवसात फाईल न सापडल्यास दाखल होणार गुन्हा

0
जळगाव । दि.21 । प्रतिनिधी-ममुराबादकडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला वाहणार्‍या लेंडी नाल्याचा प्रवाह बदलविल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
परंतू नाल्याचा नकाशा असलेली फाईल मनपातील नगररचना विभागातून गहाळ झाली आहे. येत्या दोन दिवसात फाईल न सापडल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी सहाय्यक नगररचनाकार यांना दिले आहे.

ममुराबाद रस्त्याच्या कडेला वाहणार्‍या लेंडी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्याची तक्रार आयुक्त जीवन सोनवणे यांच्याकडे आली.

त्यावरून तक्रारदार, आयुक्त, नगररचना विभागाचे अधिकारी व अभियंत्यांनी नाल्याची पाहणी करून गावनकाशावरून लेंडीनाला योग्य असल्याचा अहवाल आयुक्तांना दिला होता.

या बांधकाम परवानगी सोबतची नकाशा फाइल नगररचना विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत संबंधित अभियंता विजय मराठे, शिपाई संजीव खडके, रेकॉर्ड किपर नामदेव पोळ यांना तीन दिवसांत फाइल शोधण्याचे आदेश दिले होते.

आठवडा झाला असून अजूनपर्यंत ही फाईल सापडली नसून शुक्रवार पर्यंत फाईल सापडली नाही तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना आयुक्त सोनवणे यांनी सह्यायक नगररचनाकार श्री. फडणीस यांना आज दिल्या.

 

LEAVE A REPLY

*