मनपा आयुक्तपदी बोर्डे, हिरे, बोरसेंची चर्चा

0
जळगाव । दि.29 । प्रतिनिधी-मनपा आयुक्त जीवन सोनवणे हे उद्या दि.30 रोजी निवृत्त होणार आहे. त्यामुळे रिक्तपदावर आयुक्त म्हणून किशोर बोर्डे, मनोहर हिरे, प्रकाश बोरसे यांच्या नावाची चर्चा आहे.
मनपा आयुक्त जीवन सोनवणे हे उद्या दि.30 रोजी निवृत्त होणार आहेत. परंतु हुडको आणि गाळे प्रकरण प्रलंबित असून या दोन्ही प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आयुक्त सोनवणे यांना दोन वर्षाची मुदत वाढ मिळावी.

यासाठी महासभेत ठराव करण्यात आला होता. दरम्यान, हा ठराव शासनाकडे पाठविण्यात आला असून निर्णयाची प्रतिक्षा आहे.

आयुक्त सोनवणे यांना मुदत वाढ न मिळाल्यास रिक्तपदावर तीन अधिकारी इच्छूक आहेत.

नाशिक येथील मनपा उपायुक्त किशोर बोर्डे आणि प्रकाश बोरसे तर वरळी मुंबई येथील नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक मनोहर हिरे यांच्या नावाची चर्चा आहे.

 

LEAVE A REPLY

*