गाळे हस्तांतरणाची प्रक्रिया राबविण्यासाठी महापौरांचे उपायुक्तांना पत्र

0
जळगाव । दि.3 । प्रतिनिधी-महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे हस्तांतरण करण्याबाबत महासभेत ठराव करण्यात आला आहे.
परंतु या ठरावाची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे यावर कार्यवाही करावी, यासह अन्य प्रलंबित धोरणात्मक निर्णयावर कार्यवाही करावी, यासाठी महापौर नितीन लढ्ढा यांनी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांना पत्र दिले आहे.

ट्रान्सपोर्ट नगर, असोदा शिवारात आरक्षित ट्रान्सपोर्ट नगरची जागा भूसंपादन करण्यासाठी पाठपुरावा करुन महापालिकेच्या ताब्यात घेण्यात यावी, महापालिकेचे जलतरण तलाव भाडेतत्त्वावर देण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून मक्तेदाराला कार्यादेश देण्याची प्रक्रिया करावी, रामदास पाटील सेवा स्मृति ट्रस्ट यांना मनपा संचलित शाहू महाराज रुग्णालयात रुग्णसेवा ना नफा ना तोटा तत्त्वावर करण्याबाबत अटी शर्तींचा खुलासा त्वरित देण्यात यावा. व्यापारी संकुलातील गाळे हस्तांतरणची प्रक्रिया राबवावी, अशा आशयाचे पत्र महापौर नितीन लढ्ढा यांनी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांना दिले आहे.

 

LEAVE A REPLY

*