महापालिकेला करावी लागणार प्रतीक्षा

0
जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-मंत्रालयात झालेल्या हुडकोच्या कर्जासंदर्भात समन्वय समितीची बैठक झाली होती. यानुसार मनपाने थकीत कर्जासाठी 2004 च्या पुनर्गठन नुसार मनपाकडे 77 कोटी 45 लाख रुपयांचा प्रस्ताव काढून मुंबई हुडकोला आयुक्त जीवन सोनवणे यांनी सादर केला होता.
या प्रस्तावावर दिल्लीत होणार्‍या संचालकांच्या दि. 29 रोजी होणार्‍या बैठकीत निर्णय होण्याची दाट शक्यता होती. परंतू मुंबईच्या हुडकोकडून प्रस्ताव दिल्लीमध्ये न पाठविल्याने मनपाजा पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार आहे.

तत्कालीन नगरपालिकेने हुडकोकडून घरकुल, वाघूर पाणीपुरवठा, रस्ते, व्यापारी संकूल यासह विविध योजनांसाठी 141 कोटी 34 लाखांचे कर्ज घेतले होते.

परंतू मनपाचे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने मनपाकडून हुडकोचे हप्ते थकले होते. त्यामुळे कर्जाची 2004 मध्ये पुनर्रचना करण्यात आली होती.

दरम्यान न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यशासन, हुडको व मनपाच्या बैठकीतून कर्जाच्या 2004 च्या पुनर्गठनानुसार महापालिकेने आतापर्यंत केलेल्या परतफेडीचा तपशील अहवाल मनपाने तयार केला आहे.

तसेच मनपाने सादर केलेल्या प्रस्तावात 2011 ते 13 या काळात पेसै न भरल्याने थकीत हप्ते तसेच व्याजासह मनपाकडे 77 कोटी 45 लाख रुपये मनपाकडे बाकी आहे.

असा प्रस्ताव आयुक्त सोनवणे यांनी शासनाचे वित्त विभागाचे मुख्य सचिव डि. के. जैन यांना दाखवून मुंबई हुडकोला प्रस्ताव दिला होता.

परंतू हा प्रस्ताव मुंबई हुडकोने दि. 29 रोजी दिल्लत होणार्‍या बैठकीत सादर करणे गरजेचे होते.मात्र हा प्रस्ताव दिल्ली हुडकोला पाठविला गेला नसल्याने उद्या होणार्‍या बैठकीत हुडकोचा विषय मांडला जाणार नाही.

त्यामुळे मुंबईहुडको दिल्लीला प्रस्ताव देईल त्यावर काय निर्णय होईल याची वाट मनपाला बघावी लागणार आहे.

दिल्लीला हुडको दोन प्रस्ताव पाठविणार
हुडकोसाठी घेतलेल्या सन 2004 च्या पुनर्रचनेचा प्रस्ताव हा मनपनाच्या जीआर नुसार साडे आठ टक्केनुसार काढला होता.

परंतू मुंबई हुडको ही नऊ टक्के नुसार कर्जाची रक्कम बाकीचा असल्याचा आग्रही आहे. त्यानुसार प्रस्ताव तयार करत असल्याची माहिती मिळाली आहे.

त्यामुळे मनपाचा 8.50 टक्केचा व हुडकोचा 9 टक्केचा असे दोन प्रस्ताव दिल्ली हुडकोला जाण्याची शक्यता आहे.

 

LEAVE A REPLY

*