कालबद्ध पदोन्नतीच्या यादीत गौडबंगाल

0
जळगाव । दि.27 । प्रतिनिधी-गेल्या काही वर्षांपासून सेवा ज्येष्ठता यादी अभावी पदोन्नतीचे प्रकरण प्रलंबित होते. मात्र आता आस्थापना विभागाने कालबद्ध पदोन्नतीसाठी 471 कर्मचार्‍यांचा प्रस्ताव तयार केला असून उद्या दि.28 रोजी आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
आस्थापना विभागाने तयार केलेल्या यादीत ज्या अधिकार्‍यांना यापूर्वी कालबद्ध पदोन्नती मिळाली, अशा काही अधिकार्‍यांची नावे देखील यादीत असल्याचे वृत्त आहे.
कर्मचार्‍यांना कालबद्ध पदोन्नती देणे अपेक्षित आहे. मात्र मनपात सेवा ज्येष्ठता यादी नसल्याने कालबद्ध पदोन्नतीचे प्रस्ताव रखडले होते.

राजेंद्र पाटील यांनी आस्थापना अधिक्षक पदाची सुत्र घेतल्यानंतर सेवाज्येष्ठता यादीची प्रक्रिया सुरु केली. त्यानंतर कालबद्ध पदोन्नतीसाठी 471 कर्मचार्‍यांची यादी तयार केली आहे.

दरम्यान, उद्या दि.28 रोजी आयुक्त जीवन सोनवणे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत कालबद्ध पदोन्नतीच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

आस्थापना विभागाने तयार केलेल्या यादीत काही कर्मचार्‍यांनी यापूर्वी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ घेतला. अशा कर्मचारी अधिकार्‍यांचेही नाव यादीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

यादीत नाव समावेश करण्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याबाबतची चर्चा महापालिकेत आज रंगली होती.

 

LEAVE A REPLY

*