गाळेधारकांच्या सुनावणीला उद्यापासून सुरवात

0
जळगाव । दि.22 । प्रतिनिधी-मनपा मालकीचे 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 175 गाळेधारकांपैकी सुनावणीबाकी असलेल्या 1 हजार 704 गाळेधारकांना महापालिका प्रशासनातर्फे ‘81 ब’नुसार सुनावणीची नोटीस देण्यास सुरवात झाली आहे.
दि.24 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार, नगररचना विभागाचे सह्यायक संचालक एस. एस. फडणीस गाळेधारकांच्या सुनावण्या घेणार आहेत.
महापालिकेच्या मालकीच्या 18 व्यापारी संकुलातील गाळेधारकांची मुदत दि. 31 मार्च 2012 ला संपली होती. त्यानुसार मनपाने पाचपट भाडे वसूल करण्यासाठी महासभेत ठराव क्रमांक (40) हा दि.19 डिसेंबर 2016 ला केला होता.

त्यानुसार मनपाने प्रक्रिया राबवित असताना गाळेधारकांनी राज्यशासनाकडे धाव घेत ठरावाला स्थगिती मिळविली. दरम्यान काही गाळेधारकांच्या सुनावण्या आधी झालेल्या आहेत.

आता राहिलेले 1 हजार 704 गाळेधारकांना 81 ‘ब’ ची नोटीस बजावून त्यांच्या सुनावण्या घेवून त्यांचे म्हणणे एकूण निर्णय दिला जाणार आहे.

उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्याकडे महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, वालेचा मार्केट, शास्त्री टॉवर मार्केट, छत्रपती शाहु महाराज, जुने शाहु मार्केट, शाहु महाराज जवळील मार्केट येथील 867 गाळे धारकांची सुनावणी दि. 24 जुलैपासून ते 1 ऑगस्ट दरम्यान दुपारी 3 ते 4 या वेळेत होईल.

तर सहायक संचालक एस. एस. फडणीस हे गेंदालाल मिल मार्केट, लाठी शाळा मार्केट, शिवाजीनगर दवाखाना जवळील मार्केट, महात्मा गांधी मार्केट, भास्कर मार्केट, रेल्वे स्टेशन मार्केट, धर्मशाळा मार्केट, शामा प्रसाद मुखर्जी मार्केट, नानीबाई मार्केट, जुने बी. जे. मार्केट येथील 837 गाळेधारकांची दि.3 ते 11 ऑगस्ट 2017 पर्यत सुनावणी घेतील.

 

LEAVE A REPLY

*