पाचपट दंड रद्द करुन दोन टक्के व्याज

0
जळगाव । दि.19 । प्रतिनिधी-मनपाच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडील थकीत भाडे वसुल करण्यासाठी मनपा प्रशासनाने पाचपट दंड आकारणीचा ठराव केला होता.
या ठरावावर नगरविकास राज्यमंत्र्यांकडे सुनावणी झाली असून निर्णय प्रलंबित आहेत. दरम्यान, पाचपट दंड आकारणी रद्द करुन त्याऐवजी दोन टक्के व्याज आकारणी करण्याची शिफारस नगरविकास विभागाने केली असल्याचे समजते.
मनपा मालकीच्या 27 व्यापारी संकुलांपैकी 18 व्यापारी संकुलातील 2175 गाळ्यांची मुदत दि.31 मार्च 2012 रोजी संपुष्टात आली आहे.

गेल्या चार वर्षांपासून गाळेधारकांकडे भाडे थकले आहे. थकीत भाडे वसुलीसाठी महासभेने पाचपट दंड आकारणीचा 40 क्रमांकाचा ठराव केला होता.

मात्र या ठरावाला काही गाळेधारकांनी हरकत घेवून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी 40 क्रमांकाच्या ठरावाला स्थगिती देवून नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्याकडे सुनावणीचे आदेश दिले.

त्यानुसार ना.डॉ.रणजित पाटील यांच्याकडे सुनावणी झाली. यावेळी मनपा प्रशासन, गाळेधारकांच्या प्रतिनिधींनी बाजू मांडली.

मात्र निर्णय प्रलंबित आहेत. मनपा आणि व्यापारी या दोघांचाही सकारात्मक पद्धतीने तोडगा काढण्यासाठी नगरविकास विभागाने पाचपट दंड रद्द करुन त्याऐवजी दरमहा दोन टक्के व्याज आकारणी करण्याची शिफारस केली आहे.

 

LEAVE A REPLY

*